Alia Bhatt: राहाचा 'तो' फोटो पाहताच मला अश्रू अनावर झाले; असं का म्हणाली आलिया भट्ट?

Alia Bhatt On Raha : आलिया भट्ट आणि करीना कपूर या दोघींनी करण जोहरच्या कॉफी विथ करण शोच्या एपिसोडमध्ये हजेरी लावली आहे.
Alia Bhatt
Alia BhattSaam Tv

Alia Bhatt In Koffee With Karan Season 8:

बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे आलिया भट्ट. आलिया सध्या खूप जास्त चर्चत आहे. त्याच कारण म्हणजे कॉफी विथ करण. आलिया भट्ट आणि करीना कपूर या दोघींनी करण जोहरच्या कॉफी विथ करण शोमध्ये हजेरी लावली आहे.

यावेळी आलिया आणि करीना कपूरने अनेक खुलासे केले. त्याचसोबत करण जोहरने आलियाला राहाबद्दल बोलत केलं आहे. यावेळी आलियाने राहाबद्दलचा एक किस्सा शेअर केला. आलियाने म्हणाली की, एक अशी गोष्ट घडली होती की मला अश्रू अनावर झाले. आलियाने अश्रू अनावर होण्यामागचे कारणदेखील सांगितले आहेत.

'कॉफी विथ करण' शोमध्ये करण जोहर आलियाला म्हणाला, आलिया तू राहाबद्दल खूप जास्त प्रोटेक्टिव्ह आहे, असं का? त्यावर आलिया म्हणाली की, 'मला आठवतय एकदा राहाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी मी रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाचं काश्मीरमध्ये शुट करत होते. माझ्यासाठी तो काळ खूप कठीण होता.

आई झाल्यावर हे माझ पहिलंच शुटिंग होते. आई झाल्यावर प्रत्येकालाच आरामाची आवश्यकता असते. मला राहाला सांभाळण खूप अवघड जात होते. मी रणवीरला फोन करुन त्याला हे सांगितलं. तो त्याच काम पुढे ढकलून राहाला न्यायला येईल असं त्यानं सांगितलं. त्यावेळी मला खूप अपराधी वाटलं. त्यानंतर प्रवास करत असताना मला राहाचा एक फोटो दिसला. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होत होता. राहाचा फोटो पाहताच मला अश्रू अनावर झाले'.

Alia Bhatt
Amruta Deshmukh-Prasad Jawade Wedding :अमृता देशमुख-प्रसाद जवादेच्या घरी लगीनघाई; ग्रहमखाचे सुंदर फोटो केले शेअर

लोकांना राहाचा फोटो दिसू नये अशी आलियाची इच्छा होती. त्यामुळे फोटो पाहताच तिला खूप भरुन आलं.

Alia Bhatt
World Cup 2023: तुम्ही वर्ल्डकप फायनल बघू नका', चाहत्याने अमिताभ बच्चन यांना असा का दिला सल्ला?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com