Marathi Movie: महाराष्ट्रात लागू होणार ‘आणीबाणी’; अरविंद जगताप आणि प्रवीण तरडे यांचा नवा सिनेमा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

Marathi Movie Poster: चिंता वाढवायला नाही तर कमी करायला ‘मनोरंजनाची आणीबाणी’ लागू होणार आहे.
AaniBani Marathi Movie Poster
AaniBani Marathi Movie PosterSaam TV

AaniBani Marathi Movie: अरविंद जगताप यांना आपण आपल्याला चला हवा येऊ द्या माध्यमातून भेटले असाल. त्यांचं लिखाण जितकं प्रेक्षकांना हसवत तितकंच त्यांच्या डोळ्यातून पाणी देखील आणत. त्यांनी लिहिलेलं अनेक इमोशन स्किट आपण पाहिलं आहेत. आता अरविंद जगताप चित्रपटाचे लेखन करणार आहेत. 'आणीबानी' असे या चित्रपटाचे नाव आहे.

'आणीबाणी' म्हटलं कि, ती सर्वसामान्य जनतेची चिंता वाढवणारी असते. त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारी असते. पण आता मात्र चिंता वाढवायला नाही तर कमी करायला ‘मनोरंजनाची आणीबाणी’ लागू होणार आहे. लेखक अरविंद जगताप आणि दिग्दर्शक दिनेश जगताप यांनी विनोदाची ही ‘आणीबाणी’ प्रेक्षकांसाठी आणली आहे.

AaniBani Marathi Movie Poster
Punya Bhushan Award 2023: ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, सयाजी शिंदे, संजय खापरे, वीणा जामकर, उषा नाईक, प्राजक्ता हनमघर, सीमा कुलकर्णी, रोहित कोकाटे, सुनील अभ्यंकर, पद्मनाभ बिंड, किशोर नांदलस्कर अशा मराठीतील अनेक दिग्गजांचा या ‘आणीबाणी’त सहभाग आहे. 'दिनिशा फिल्म्स' निर्मित ‘आणीबाणी’ हा मराठी चित्रपट येत्या जूनमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

राजकीय परिस्थितीवर आपल्या मिश्किल लिखाणाने प्रहार करत लेखक अरविद जगताप यांनी वेगवेगळे मुद्दे चित्रपटातून आजवर मांडले आहेत. आता आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर नवरा बायकोच्या नात्याची हलकीफुलकी गोष्ट ते घेऊन आले आहेत. ही ‘आणीबाणी’ कोणासाठी अडचण ठरणार? आणि अडचणीत सापडलेले या आणीबाणीतून कसे बाहेर पडणार ? याची मनोरंजक कथा यात मांडण्यात आली आहे.

दिग्गज कलाकारांची मोट एकत्र बांधत सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांच्या साथीने दिग्दर्शकीय पदार्पण करणारे दिनेश जगताप मनोरंजनाची मिसळ आपल्याला चाखायला देणार आहेत. मनोरंजनाची ही मिसळ प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा विश्वास दिनेश जगताप व्यक्त करतात.

AaniBani Marathi Movie Poster
Web Series On Sheena Bora Case: देशातील सर्वात धक्कादायक मर्डर मिस्ट्रीवर बनणार वेब सीरीज, हत्याकांडाचं रहस्य उलगडणार?

कृष्णा जगताप, योगेश शिंदे, सचिन जगताप, अमोल महाडिक ‘आणीबाणी’ चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा,पटकथा,संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. गीतकार वलय मुळगुंद आणि प्रसन्न यांनी लिहिलेल्या गीतांना हरिहरन, अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, सायली पंकज, गणेश चंदनशिवे यांनी स्वरबद्ध केले आहे.

देवदत्त मनीषा बाजी, आदित्य पटाईत,पंकज पडघन यांनी संगीतसाज दिला आहे. पार्श्वसंगीत पंकज पडघन यांचे आहे. वेशभूषा पूर्णिमा ओक तर कलादिग्दर्शन सुधीर सुतार यांचे आहे. साऊंड डिझाईनची जबाबदारी निखिल लांजेकर यांनी सांभाळली आहे. डी.आय,..किरण कोट्टा आणि मिक्स,.. नागेश राव चौधरी यांनी केले आहे. छायांकन मंगेश गाडेकर यांनी केले असून या संकलन प्रमोद कहार यांचे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com