Web Series On Sheena Bora Case: देशातील सर्वात धक्कादायक मर्डर मिस्ट्रीवर बनणार वेब सीरीज, हत्याकांडाचं रहस्य उलगडणार?

Sheena Bora Case News : आठ वर्षांपुर्वी 2015 साली समोर आलेल्या शीना बोरा हत्याकांडाने देश हादरला होता. या प्रकरणाची माध्यमांमध्येही मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.
Sheena Bora Case Web Series
Sheena Bora Case Web Seriessaam tv
Published On

>>सुरज सावंत

Sheena Bora Case Web Series : देशातील सर्वात धक्कादायक मर्डर मिस्ट्रीपैकी एक असलेल्या शीना बोरा हत्याकांडाचं रहस्य अद्याप उलगडलेलं नाही. परंतु आता या हत्याकांडावर एक वेब सीरीज बनवली जाणार आहे. ही वेब सीरीज पत्रकार संजय सिंग यांच्या ‘एक थी शीना बोरा’ या पुस्तकावर आधारित असणार आहे.

आठ वर्षांपुर्वी 2015 साली समोर आलेल्या शीना बोरा हत्याकांडाने देश हादरला होता. या प्रकरणाची माध्यमांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. या प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. परंतु या हत्याकांडाचे रहस्य अजूनही उलगडलेले नाही. त्यामुळे या हत्याकांडावरील वेबसीरीज देखील अशाच धक्कादायक रहस्यांची मालिका असण्याची शक्यता आहे.

Sheena Bora Case Web Series
Sanjay Raut News: CM शिंदेंचा संजय राऊतांना धक्का! संसदीय नेतेपदावरुन हटवले; 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

नेमकं काय आहे प्रकरण?

या हत्याकांडाचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या मते, इंद्राणी मुखर्जीने तिचा पहिला पती सिध्दार्थ दासपासून झालेली मुलगी शीना बोराचा खून आपला दुसरा नवरा संजीव खन्ना आणि चालकाच्या मदतीनं केला.

इंद्राणीचा तिसरा नवरा पीटर मुखर्जीचा मुलगा राहुलसोबत शीनाचं प्रेम प्रकरण सुरू होतं. राहुल पीटरच्या पहिल्या बायकोपासून झालेला मुलगा होता. यामुळं या दोघांचं लग्न होवू नये असं इंद्राणीला वाटत होतं. इंद्राणीचा दुसरा नवरा संजीव खन्नापासून झालेल्या मुलीला तिसरा नवरा पीटरनं दत्तक घेतलं होतं. (Latest Marthi News)

तीन वर्षांनी उघडकीस आले प्रकरण

शीना बोराची हत्या 24 एप्रिल 2012 रोजी करण्यात आली होती. यानंतर इंद्राणीचा चालक शामवर रायला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारे इंद्राणीला साल 2015 मध्ये अटक करण्यात आली.

इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि शामवर राय यांनी मिळून पहिल्या पतीपासूनची मुलगी शीनाची हत्या केली आणि त्यांच्याच मदतीनं 25 एप्रिल 2012 रोजी तिच्या मृतदेहाची विल्टेवाट लावली होती. अखेर 2015 मध्ये हे प्रकरण उघडकीस आलं.

Sheena Bora Case Web Series
Sangli News: राज ठाकरेंचा अल्टीमेटम अन् सांगली महापालिका अधिका-यांची पळापळ, महापालिका आयुक्तांनी घेतला 'हा' निर्णय

इंद्राणी-पीटर मुखर्जीचा घटस्पोट

इंद्राणीने वांद्रे येथे शीनाची गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रायगड गाठलं होतं. पोलिसांनी इंद्राणीसोबत तिचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्नालाही हत्या आणि पुरावे मिटवल्याच्या आरोपाखाली अटक केली होती.

सीबीआयने कटात सहभागी असल्याने पीटर मुखर्जीलाही अटक केली होती. 2020 मध्ये त्याला जामीन देण्यात आला. खटला सुरु असतानाच पीटर मुखर्जी आणि इंद्राणीचा घटस्फोट झाला.

संपूर्ण प्रकरण अतिशय रहस्यमय

ही गुंता गुंतीची रहस्यमय कथा संजय सिंग यांनी पुस्तक स्वरूपात मांडली. याच पुस्तकाचा आधार घेऊन वेब सीरिज बनवली जात आहे. यापूर्वी लेखक संजय सिंग यांनी हजारो कोटी रुपयांच्या तेलगी बनावट स्टॅम्प घोटाळ्याचाही पर्दाफाश केला आहे. (Crime News)

या घोटाळ्यावर त्यांनी ‘स्कॅम 2003 : तेलगी स्टोरी’ पुस्तक देखील लिहिले आहे. एवढेच नाही तर ‘स्कॅम 2003 : तेलगी स्टोरी’ पुस्तकावर सीरीज देखील बनवण्यात आली आहे. ही वेब सीरीज देखील लवकरचं ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com