Punya Bhushan Award 2023: ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

Punyabhushan Award Declared To Mohan Agashe: ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना यावर्षीच्या पुण्यभूषण पुरस्कारने सन्मानित करण्यात येणार आहे.
Punyabhushan Award Declare To Mohan Agashe
Punyabhushan Award Declare To Mohan AgasheInstagram @mohan.agashe
Published On

Mohan Agashe News: मराठी-हिंदी नाट्य-चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना यावर्षीच्या पुण्यभूषण पुरस्कारने सन्मानित करण्यात येणार आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने मोशन आगाशे यांना हा पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे. यावेळी सीमेवर लढताना जखमी झालेल्या जवानांना देखील गौरविण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी कळविले आहे.

पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे गेली ३३  वर्षे सातत्याने दिला जाणारा हा पुरस्कार देशासह परदेशातही प्रतिष्ठेचा समजला जातो. २०२३ या वर्षाचा पुण्यभूषण पुरस्कारचा जुलै महिन्यात दिमाखदार सोहळा होणार असून या पुरस्कराचे यंदाचे ३४ वे वर्ष आहे. सलग ३३ वर्षे संस्थेने, संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आणि देशाच्या बाहेरही या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्काराचा भव्य उपक्रम राबविला.  

Punyabhushan Award Declare To Mohan Agashe
Rashmika Mandanna:नॅशनल क्रशचा जिममधील Viral Video; रश्मिकाला पाहून चाहत्यांचा उडाला फ्युज

स्मृतिचिन्ह आणि रूपये एक लाख रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरणाऱ्या बालशिवाजींची प्रतिकृती आणि पुण्याच्या ग्रामदैवतांचे छायाचित्र असलेले  स्मृतिचिन्ह हे या पुरस्कारचे वैशिष्ट्य आहे. याबरोबरच कर्तव्य बजावित असताना जखमी झालेल्या ५ जवानांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात येणार आहे.

त्यामध्ये सेलर राधाकृष्णन्, हवालदार पंजाब एन. वाघमारे, सेलर सुदाम बिसोई, गनर उमेंद्र एन. आणि लान्स नाईक निर्मलकुमार छेत्री यांचा गौरव करण्यात येणार आहे. यापूर्वी विविध क्षेत्रातील आपल्या अतुलनीय योगदानाने पुण्याचे नाव जगभर पोचविणाऱ्या ३३  ज्येष्ठ पुणेकरांना गौरविण्यात आले आहे.

अभिनेते मोहन आगाशे हे मानसशात्रज्ञ आहेत. त्यांनी हिंदी-मराठी व्यतिरिक्त दाक्षिणात्य चित्रपटामध्ये काम केले आहे. त्यांनी अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. 'जैत रे जैत' मधील नाग्या तसेच घाशीराम कोतवाल ह्या त्याच्या गाजलेल्या भूमिका आहेत.

कारखानीसांची वारी, तूफान, बच्चन पांडे, चंद्रमुखी या चित्रपटही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. तसेच दिथी या चित्रपटाचे ते निर्माते होते. झी ५ वरील हुतात्मा आणि रानबाजार या वेबसीरीजमध्ये त्यांनी काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com