Swarajya Kanika Jijau: म्हणे जन्मावा शिवबा, आधी जिजाऊ घडाव्या लागतात, तेजस्विनी पंडित 'स्वराज्य कनिका - जिजाऊ'मधून येतेय भेटीला

Tejaswini Pandit New Film: तेजस्विनी पंडीत 'स्वराज्य कनिका - जिजाऊ' (Swarajya Kanika Jijau Movie) या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तेजस्विनी पंडितने या चित्रपटाबाबत माहिती दिली.
Tejaswini Pandit
Tejaswini Pandit Saam Tv

Tejaswini Pandit Movie:

मराठमोळी अभिनेती तेजस्विनी पंडीत (Tejaswini Pandit) सध्या चर्चेत आली आहे. तेजस्विनी चर्चेत येण्यामागचे कारण तिची इन्स्टा पोस्ट किंवा फोटो नाही. तर तेजस्विनी तिच्या नव्या प्रोजेक्टमुळे चर्चेत आली आहे. तेजस्विनी नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. तेजस्विनी पंडीत 'स्वराज्य कनिका - जिजाऊ' (Swarajya Kanika Jijau Movie) या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तेजस्विनी पंडितने या चित्रपटाबाबत माहिती दिली.

राष्ट्रमाता, राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले... यांनी हिंदवी स्वराज्याची पायाभरणी करून या मुलुखाला छत्रपती शिवाजी महाराज दिले. बुद्धिमत्ता, चातुर्य, पराक्रम, शौर्य, दूरदृष्टी, कुशल राजनिती, कुटुंबवत्सल असे सगळेच गुण त्यांच्यात होते. शिवबाचे शिवराय घडवताना या माऊलीने अनेक वादळं पेलली. पण या वादळात ही तेजस्वी ज्योत आणखी प्रखर झाली. प्रत्येक कसोटीवर खऱ्या उतरून या माऊलीने स्त्रीशक्ती आणि मातृशक्तिचे चिरंतन उदाहरण आपल्या सर्वांना दिले.

जगाला दिशा देणाऱ्या या जगत्जननीच्या आयुष्यावर आधारित 'स्वराज्य कनिका जिजाऊ' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात जिजाऊंची भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित साकारणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले असून राजमाता जिजाऊ यांची करारी मुद्रा यात दिसत आहे. ६ फायरफ्लाईज प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन अनुजा देशपांडे या करत आहेत.

Tejaswini Pandit
Annapoorani Movie: 'अन्नपूर्णानी' चित्रपटाच्या टीमची अडचण वाढली, नयनतारासह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल

तेजस्विनी पंडीतने आपल्या अधकिृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नव्या चित्रपटाची घोषणा करत एक पोस्ट शेअर केली आहे. तेजस्विनीने या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'म्हणे जन्मावा शिवबा, आधी जिजाऊ घडाव्या लागतात॥ 'दिल्लीपती' कोण असावा हे रायगडावर बसून 'हिंदुपती' ठरवणारा ज्यांनी छत्रपती घडविला. स्वराज्याचा वसा घेऊन प्रत्येक मराठी मनावर ठसा उमटवणार्‍या राजमाता जिजाऊसाहेबांना त्रिवार मुजरा व साष्टांग दंडवत. जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय. लवकरच चित्रपटगृहात…' तेजस्विनीच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांनी चांगली पसंती दिली असून तिला या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Tejaswini Pandit
Raid 2 Movie: अजय देवगणच्या 'रेड 2'मध्ये रितेश देशमुखची एन्ट्री, चित्रपटात कोणत्या भूमिकेत दिसणार अभिनेता?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com