Husband Wife Clash : बायको बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये, अचानक नवऱ्याची एन्ट्री; पुढे काय घडलं? वाचा

Wife cheted with husband : बॉयफ्रेंडसोबत असणाऱ्या बायकोला नवऱ्याने रंगेहाथ पकडलं. त्यानंतर बॉयफ्रेंड रस्त्यावरून पळत सुटला.
Crime News
Mumbai CrimeSaam tv
Published On
Summary

हापूडमधील हॉटेलमध्ये पतीने पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडला नग्न अवस्थेत पकडलं.

संतप्त पती आणि नातेवाईकांनी बॉयफ्रेंडला मारहाण केली.

बॉयफ्रेंड नग्न अवस्थेत हॉटेलमधून पळून गेला, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

पत्नी स्वत: बाथरुममध्ये लपली, पोलिसांकडून पुढील तपास सुरू.

उत्तर प्रदेशच्या हापूडमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. पतीने पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

Crime News
Mumbai Train Blast : मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण : फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार

पती आणि त्याच्या नातेवाईंकांनी अचानक हॉटेल गाठलं. त्यावेळी पत्नी तिच्या बॉयफ्रेंडसोबत बेडवर नग्न अवस्थेत होती. पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडला पाहून नवरा भडकला. त्याने आणि त्याच्या नातेवाईकांनी बॉयफ्रेंडला झोडपलं. त्यानंतर बॉयफ्रेंड कपडे न घालताच रस्त्यावर पळत सुटला. या बॉयफ्रेंडचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर पत्नीने स्वत:ला बाथरुममध्ये कोंडून घेतलं.

मिळालेल्या माहितीनुसार, गढमुक्तेश्वर कोतवाली भागातील मोहल्ला गड चौपला ही घटना आहे. महिला आणि तिच्या पतीचं मागील काही दिवसांपासून वादविवाद सुरु होते. महिलेने पतीच्या कुटुंबीयांच्या विरोधात तक्रार देखील नोंदवली होती.

Crime News
Maharashtra Politics : बटन दाबलं की दिल्ली हादरेल, भाजपमध्ये भूकंप येईल, मग दाबा बटन; गिरीश महाजन यांचं एकनाथ खडसेंना आव्हान

पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. पतीचा गुरुवारी पत्नीवरील संशय अधिक बळावला. त्याने घराबाहेर निघालेल्या पत्नीचा पाठलाग केला. पत्नी अचानक एका हॉटेलमध्ये गेली. हॉटेलमधील एका रुममध्ये पत्नी आणि तिचा बॉयफ्रेंड होते.याच रुममध्ये नवऱ्याने अचानक एन्ट्री केली.

नवऱ्याला पाहून पत्नी बाथरुममध्ये लपली. तर तिचा बॉयफ्रेंड तावडीत सापडला. पती आणि त्याच्या नातेवाईकांनी बॉयफ्रेंडला मारहाण केली. बॉयफ्रेंडने त्यांच्या तावडीतून पळ काढला. बॉयफ्रेंडने नग्न अवस्थेतच हॉटेलमधून पळाला. बॉयफ्रेंडचा पळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहे.

Crime News
jalna Shocking : जालना हादरलं! आश्रम शाळेत मध्यरात्री 8 वर्षांच्या मुलाची हत्या, धक्कादायक कारण आलं समोर
Q

हापूडमध्ये नेमकं काय घडलं?

A

पतीने पत्नी आणि तिचा बॉयफ्रेंड हॉटेलमध्ये नग्न अवस्थेत पकडले. बॉयफ्रेंड पळून गेला आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.

Q

पतीने हॉटेलमध्ये कसा प्रवेश केला?

A

पत्नीवर संशय असलेल्या पतीने तिचा पाठलाग केला आणि अचानक हॉटेलमध्ये प्रवेश करत तिला रंगेहाथ पकडलं.

Q

पोलीस या प्रकरणात काय करत आहेत?

A

पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com