Crime: बँक मॅनेजरची नवऱ्याकडून हत्या, गोळ्या झाडून बहिणीलाही संपवलं; नंतर उचललं टोकाचं पाऊल

Bank Manager Killed In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमध्ये तरुणाने बँकेची मॅनेजर असलेल्या बायकोची आणि बहिणीची हत्या केली. त्यानंतर टोकाचे पाऊल उचलत त्याने आयुष्य संपवलं.
Crime: बँक मॅनेजरची नवऱ्याकडून हत्या, गोळ्या झाडून बहिणीलाही संपवलं; नंतर उचललं टोकाचं पाऊल
Uttar Pradesh Crime Saam Tv
Published On
  • लखनऊमध्ये कौटुंबिक वादातून भयंकर हत्याकांड

  • लखनऊमध्ये नवऱ्याने बँक मॅनेजर बायकोची हत्या केली

  • बँकेच्या बाहेर गोळ्या झाडून बायकोला संपवलं

  • बायकोनंतर बहिणीची हत्या करून नवऱ्याने केली आत्महत्या

उत्तर प्रदेशमध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली. बँक मॅनेजरची नवऱ्याने गोळ्या झाडून हत्या केली. ऐवढ्यावर न थांबता आरोपीने बहिणीवर देखील गोळीबार करत तिला संपवलं. त्यानंतर त्याने आत्महत्या केली. दिवसाढवळ्या घडलेल्या या हत्याकांडाच्या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली. पोलिस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊच्या गोमतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरूवारी दुपारी ही घटना घडली. आयसीायसीआय बँकेमध्ये कार्यरत असलेल्या दिव्या मिश्रा या रिलेशनशिप मॅनेजरची हत्या करण्यात आली. दिव्याच्या नवऱ्याने तिला बँकेबाहेर बोलावून तिच्यावर गोळ्या झाडल्या. दोघांमध्ये कौटुंबीक वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. मानस असं आरोपीचे नाव असून त्याने बायकोची हत्या आणि आत्महत्या करण्यापूर्वी व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवले होते.

Crime: बँक मॅनेजरची नवऱ्याकडून हत्या, गोळ्या झाडून बहिणीलाही संपवलं; नंतर उचललं टोकाचं पाऊल
Nagpur Crime: नागपूर हादरले! सैनिकी स्कूलमध्ये विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार, शाळेच्या संचालकाला अटक

'माझ्या बायकोने मला चीट केले त्यामुळे मी तिची हत्या केली. आता मी माझ्या बहिणीची हत्या करायला आणि आत्महत्या करण्यासाठी निघालो आहे.', असे त्याने स्टेटसवर ठेवले होते. व्हॉट्सअपवर स्टेट्स ठेवल्यानंतर हत्या करण्यात आलेली बँक मॅनेजर दिव्या आलमबागच्या सिंगारनगर येथे राहत होती. दिव्या आणि तिचा नवरा मानस यांच्यातील कौटुंबीक वाद फॅमिली कोर्टात सुरू होता. बायकोने मला चीट केल्याचा आरोप करत मानसने तिची हत्या केली.

Crime: बँक मॅनेजरची नवऱ्याकडून हत्या, गोळ्या झाडून बहिणीलाही संपवलं; नंतर उचललं टोकाचं पाऊल
Kalyan Crime: कल्याण हादरले! डोक्यावर वार करत तरुणीने बॉयफ्रेंडला संपवलं, मृतदेह गोणीत भरून २४ तास पाण्यात ठेवला

घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दिव्याला तात्काळ गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. बायकोनंतर मानसने बहिणीची देखील हत्या केली. त्याने हुसडिया येथे जाऊन बहिणीवर देखील गोळीबार केला. याा घटनेत गंभीर जखमी झालेल्या त्याच्या बहिणीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याने आत्महत्या केली. गोळीबाराच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला.

Crime: बँक मॅनेजरची नवऱ्याकडून हत्या, गोळ्या झाडून बहिणीलाही संपवलं; नंतर उचललं टोकाचं पाऊल
Crime News : महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलीला उसाच्या फडात नेवून सामूहिक अत्याचार; तिघांना अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com