Crime News : महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलीला उसाच्या फडात नेवून सामूहिक अत्याचार; तिघांना अटक

Hingoli Crime News : हिंगोलीच्या वसमत तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून चौथ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
Hingoli Minor Girl Assault Case: Three Accused Arrested
Hingoli Minor Girl Assault Case: Three Accused ArrestedAI Image
Published On
Summary
  • हिंगोलीच्या वसमत तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

  • मुलीला बिस्किटे आणि पैशांचे आमिष दाखवून शेतात नेल्याचा आरोप

  • या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल

  • पोलीस तपास सुरु

Hingoli Gang Rape Case Update News पुण्यातील जुन्नरमध्ये १० वर्षांच्या मुलीला सायकल चालवण्याच्या बहाण्याने शेतात नेवून अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. वसमत तालुक्यातील हट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील शेतशिवारात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन संशयित आरोपींना अटक केली असून, एका आरोपीचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १३ ऑगस्ट रोजी ही घटना घडल्याचे समोर आले आहे. ३ तरुणांनी पीडित अल्पवयीन मुलीला बिस्किटे आणि पैशांचे आमिष दाखवले. त्यांनतर तिला फसवून उसाच्या फडात नेण्यात आले. फडात गेल्यानंतर नराधमांनी आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केले. घटनेनंतर मुलीची प्रकृती बिघडू लागल्याने तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान तिच्यावर अत्याचार झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला. त्यानंतर मुलीच्या आईने हट्टा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Hingoli Minor Girl Assault Case: Three Accused Arrested
Hair Care : केसांमधील कोंड्यावर सापडला ५ रुपयांचा उपाय, खोबरेल तेलात मिसळा, एका झटक्यात नाहीसा होईल स्कॅल्पचा त्रास

या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध पॉक्सो कायद्यासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लखन खाडे, प्रवीण खाडे आणि प्रकाश खाडे या तीन आरोपींना अटक केली आहे. तर विजय खाडे हा चौथा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Hingoli Minor Girl Assault Case: Three Accused Arrested
Rain Alert : महाराष्ट्रात विजांसह वादळी पाऊस ; ४ जिल्ह्यांना येलो अलर्ट, वाचा हवामानाचा अंदाज

या घटनेमुळे हिंगोली जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अल्पवयीन मुलीला लक्ष्य करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, घटनेशी संबंधित सर्व बाबींची चौकशी केली जात आहे. पीडित मुलीला न्याय मिळावा आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com