अहिल्यानगर, बीड, परभणी आणि नांदेडला आज येलो अलर्ट
जळगाव, नाशिक, पुणे, सोलापूरसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतही पावसाच्या सरींचा अंदाज
दुपारनंतर आणि संध्याकाळच्या सुमारास स्थानिक पातळीवर पावसाची तीव्रता वाढू शकते
राज्याच्या उर्वरित भागात मोठ्या पावसाची शक्यता तुलनेने कमी
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांत श्रावण सरींची उघडीप पाहायला मिळत आहे. मात्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही विजांसह पावसासाठी पोषक हवामान कायम आहे. आज राज्यातील ४ जिल्ह्यांना विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित जिल्ह्यांतील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज अहिल्यानगर, बीड, परभणी आणि नांदेड या चार जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. विशेषतः दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास काही ठिकाणी वातावरणात झपाट्याने बदल होऊन मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.
याशिवाय राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जळगाव, नाशिक, पुणे आणि सोलापूर या मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, धाराशिव आणि लातूर या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्येही पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्याच्या उर्वरित भागात मोठ्या पावसाची शक्यता तुलनेने कमी असून, काही ठिकाणी ऊन-सावल्यांचा खेळ सुरू राहण्याचा अंदाज आहे. या भागांत तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. विजांचा कडकडाट सुरू असताना नागरिकांनी मोकळ्या मैदानात, झाडाखाली किंवा पाण्याच्या ठिकाणी थांबणे टाळावे. तसेच वादळी वाऱ्याची शक्यता असल्याने शेतातील कामे करताना आणि प्रवास करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पुढील काही तासांत स्थानिक पातळीवर पावसाची तीव्रता वाढू शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.