Nagpur Police: पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या, पीसीएमटी क्वार्टर्समध्ये आढळला मृतदेह; पोलिस दलात खळबळ

Nagpur Police End Life: नागपूरमध्ये पोलिस अधिकाऱ्याने आयुष्य संपवल्याने एकच खळबळ उडाली. आत्महत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Nagpur Police: पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या, पीसीएमटी क्वार्टर्समध्ये आढळला मृतदेह; पोलिस दलात खळबळ
Nagpur Police End Life Saam Tv
Published On
  • नागपूरमध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षकाची आत्महत्या

  • पीसीएमटी क्वार्टर्समध्ये पोलिस अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला

  • ज्ञानेश्वर झोल असं पोलिस अधिकाऱ्याचे नाव

  • नागपूर पोलिस दलात खळबळ

पराग ढोबळे, नागपूर

नागपूरमध्ये पोलिस अधिकाऱ्याने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली. नागपूर पोलिस दलामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या पोलिसाने आयुष्य संपवलं. पीसीएमटी क्वार्टर्समध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. ज्ञानेश्वर झोल असं या पोलिस अधिकाऱ्याचे नाव होते. ते नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील पीआरओ आणि अर्ज शाखेत कार्यरत होते. त्याच्या आत्महत्येमुळे नागपूर पोलिस दलात एकच खळबळ उडाली.

ज्ञानेश्वर झोल यांनी पीसीएमटी क्वार्टर्समध्ये आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आत्महत्या केलेल्या पोलिस अधिकाऱ्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. प्राथमिक अंदाजानुसार कौटुंबिक कारण असल्याचे सांगितलं जातं असले तरी आत्महत्येचे ठोस कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Nagpur Police: पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या, पीसीएमटी क्वार्टर्समध्ये आढळला मृतदेह; पोलिस दलात खळबळ
Thane Crime: गर्लफ्रेंडला घेऊन लॉजवर गेला, भांडणानंतर राग डोक्यात गेला; हत्या करून तरुणाने पळ काढला

पोलिस अधिकारी ज्ञानेश्वर झोल यांनी रविवारी मध्यरात्री १२ ते १ वाजाताच्या सुमारास पीसीएमटी क्वॉर्टरमध्ये आत्महत्या केली. पोलिस अधिकाऱ्यासारख्या वरिष्ठ आणि जबाबदार व्यक्तीने असे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे नागपूर पोलिस दलात एकच खळबळ उडाली. ही आत्महत्या त्यांनी वैयक्तीक, कौटुंबीक की कामाच्या ताणामुळे केली याचा तपास पोलिस करत आहेत.

Nagpur Police: पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या, पीसीएमटी क्वार्टर्समध्ये आढळला मृतदेह; पोलिस दलात खळबळ
Mumbai Crime: मुंबई हादरली! बायको अन् २ मुलांची हत्या, नंतर नौदल कर्मचाऱ्याने संपवलं आयुष्य

घटनास्थळावर पोलिसांना सुसाईट नोट किंवा इतर महत्वाचा पुरावा सापडला नाही. पोलिस या घटने प्रकरणी पोलिसाच्या कुटुंबीयांकडून माहिती घेत आहेत. ते मानसिक तणावात होते की नाही याची माहिती अद्याप समोर आली नाही. ज्ञानेश्वर झोल यांनी आत्महत्या केल्यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला

Nagpur Police: पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या, पीसीएमटी क्वार्टर्समध्ये आढळला मृतदेह; पोलिस दलात खळबळ
Crime: २ पत्नी असल्याचं कळालं, बॉयफ्रेंडने प्रग्नेंट गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर मृतदेह दुसऱ्या राज्यात नेऊन पूरला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com