Crime: २ पत्नी असल्याचं कळालं, बॉयफ्रेंडने प्रग्नेंट गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर मृतदेह दुसऱ्या राज्यात नेऊन पूरला

Odisha Crime: ओडिशामध्ये तरुणाने प्रग्नेंट गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह आंध्र प्रदेशमध्ये नेऊन पूरला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
Crime: २ पत्नी असल्याचं कळालं, बॉयफ्रेंडने प्रग्नेंट गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर मृतदेह दुसऱ्या राज्यात नेऊन पूरला
Odisha CrimeSaam Tv
Published On
  • ओडिशातील गरोदर महिलेची हत्या करून आंध्र प्रदेशात मृतदेह पुरला

  • सेमिलीगुडा येथे बेपत्ता झालेल्या गरोदर महिलेच्या हत्येचा उलगडा

  • बॉयफ्रेंडने गरोदर गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह दुसऱ्या राज्यात पुरला

  • या हत्या प्रकरणात दोन आरोपींना अटक

ओडिशामध्ये हत्याकांडाची भयंकर घटना समोर आली आहे. कोरापुट जिल्ह्यातील सेमिलीगुडा येथे एका गरोदर महिलेची हत्या करण्यात आली. तिचा मृतदेह आंध्रप्रदेशमध्ये नेऊन पुरण्यात आला. या महिलेच्या बॉयफ्रेंडनेच हे भयंकर कृत्य केले. आरोपीच्या दोन बायकांविषयीची माहिती त्याच्या गर्लफ्रेंडला कळाली होती. त्यामुळे त्याने तिची हत्या केल्याची धक्कादायक माहिती तपासातून सोर आली आहे. अल्बिना गराड असं हत्या झालेल्या महिलेचे नाव होते. ती कोरापुट जिल्ह्यातील दसमंतपुर गावात राहणारी होती.

पोलिसांच्या माहितीनुसार, अल्बिना २९ जुलै रोजी सेमिलिगुडा येथून बेपत्ता झाली. १ ऑगस्ट रोजी मोहन खिल्ला यांनी सेमिलिगुडा पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. तिचा शोध घेत असताना पोलिसांना हादरवून टाकणारे सत्य समोर आले. पोलिसांना असे काही धागेदोरे सापडले त्या आधारे ते आरोपींपर्यंत पोहचले. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली. मोहन खिल्ला (३५ वर्षे) आणि मिलन कुलदीप (१९ वर्षे) अशी आरोपींची नावं आहेत. त्यांच्यावर अल्बिनाची हत्या करून तिचा मृतदेह आंध्र प्रदेशमध्ये नेऊन पुरल्याचा आरोप आहे. पोलिस तपासातून धक्कादायकक माहिती समोर आली. मोहन खिल्लाला दोन बायको होत्या आणि त्याचे अल्बिनासोबत अनैतिक संबंध होते.

Crime: २ पत्नी असल्याचं कळालं, बॉयफ्रेंडने प्रग्नेंट गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर मृतदेह दुसऱ्या राज्यात नेऊन पूरला
Nashik Crime: आमदार पुत्राची शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी; महायुतीतील वाद चव्हाट्यावर

पोलिसांनी दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी हत्येची कबुली दिली. त्यांनी अल्बिनाच्या मृतदेहाची विल्हेवाट कुठे आणि कशी लावली हे देखील सांगितले. आरोपींनी आधी अल्बिनची हत्या केली त्यानंतर तिचा मृतदेह आंध्रप्रदेशमध्ये नेऊन झाडाखाली पूरला. त्यानंतर सेमिलिगुडा पोलिसांनी आंध्र प्रदेश पोलिसांच्या मदतीने विजयनगरम जिल्ह्यातील गजपतिनगरम परिसरात शोधमोहीम राबवली. तेव्हा त्यांना मरुपल्ली गावाजवळील एका झाडाखाली अल्बिनचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.

Crime: २ पत्नी असल्याचं कळालं, बॉयफ्रेंडने प्रग्नेंट गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर मृतदेह दुसऱ्या राज्यात नेऊन पूरला
Pune Crime: स्पा सेंटरवरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, पोलिसांनी छापा टाकला; ३ महिलांना नको त्या अवस्थेत पकडलं

पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. अल्बिनाच्या वडिलांनी मृतदेहावर सापडलेल्या कपड्यांची ओळख पटवली. कार्यकारी दंडाधिकारी, कुटुंबीय आणि साक्षीदारांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. ओळख आणि तपास प्रक्रिया शास्त्रीय पद्धतीने पूर्ण करण्यासाठी डीएनए चाचणीकरिता जैविक नमुनेही जतन करण्यात आले आहेत.

Crime: २ पत्नी असल्याचं कळालं, बॉयफ्रेंडने प्रग्नेंट गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर मृतदेह दुसऱ्या राज्यात नेऊन पूरला
Kalyan Crime: कल्याण हादरले! डोक्यावर वार करत तरुणीने बॉयफ्रेंडला संपवलं, मृतदेह गोणीत भरून २४ तास पाण्यात ठेवला

तपासादरम्यान पोलिसांनी एक कार जप्त केली. अल्बिनाचा मृतदेह आंध्र नेण्यासाठी आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी या कारचा वापर करण्यात आला होता. जमीन खोदण्यासाठी वापरलेली शस्त्रेही पोलिसांनी जप्त केसी. आरोपींचे मोबाईल फोन, त्यांचे कपडे आणि इतर वैज्ञानिक पुरावेही जप्त करून तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

Crime: २ पत्नी असल्याचं कळालं, बॉयफ्रेंडने प्रग्नेंट गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर मृतदेह दुसऱ्या राज्यात नेऊन पूरला
Mumbai Crime: मुंबई हादरली! बायको अन् २ मुलांची हत्या, नंतर नौदल कर्मचाऱ्याने संपवलं आयुष्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com