

नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये महायुतीतील घटक
वामन खोसकर यांच्यावर शिवसेना तालुकाप्रमुखाला धमकी दिल्याचा आरोप
शिवसेना तालुकाप्रमुख रविंद्र भोये यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांचे पुत्र वामन हिरामण खोसकर यांनी शिवसेनेच्या तालुका प्रमुखांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय. त्यामुळे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. महायुतीमधील नेते एकमेकांच्या जीवावर उठलेत का असा प्रश्न केला जातोय.
वामन हिरामण खोसकर यांनी शिवसेना (शिंदे गट) त्र्यंबकेश्वर तालुकाप्रमुख रविंद्र भोये यांना शिवीगाळ करत त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिलीय. या प्रकरणी रविंद्र भोये यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. वामन हिरामण खोसकर यांचा कथित शिवीगाळ आणि धमकीची ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झालीय.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या कथित गैरप्रकार आणि भ्रष्टाचाराविरोधात आपण आवाज उठवत असल्याने आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याच पार्श्वभूमीवर वामन खोसकर यांनी शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप भोये यांनी केला आहे. आमदार पुत्र बैठका घेऊन ग्रामसेवकांना धमकी देतात. मला मदत करू नये म्हणून त्रास दिला जातो," असा आरोपही त्यांनी केलाय.
हिरामण खोसकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. तर रविंद्र भोये हे शिवसेनेचे नेते आहेत. राज्यात दोन्ही पक्ष महायुतीचा भाग आहेत मात्र स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये वाद उफाळून येत आहे. या प्रकरणात रविंद्र भोये यांनी आमदार हिरामण खोसकर आणि त्यांचे पुत्र वामन खोसकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गु्न्हा करण्याची मागणी केलीय.
वामन खोसकर यांनी आधीही आपल्यावर हल्ला केला होता. लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेचा पदाधिकारी असल्यानं हेमंत गोडसे यांच्यासाठी काम केलं. त्यावेळी ते काँग्रेसमध्ये होते. ते राजेभाऊ वाजे यांच्यासाठी काम करत. तेव्हाही त्यांनी माझ्यावर हल्ला केला होता. पण माझ्यासोबत पदाधिकारी असल्यानं त्यांनी मला वाचवलं होतं, असेही भोये म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.