Pune Crime: स्पा सेंटरवरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, पोलिसांनी छापा टाकला; ३ महिलांना नको त्या अवस्थेत पकडलं

Pune Prostitution Racket Busted: पुण्यामध्ये सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफास केला. पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा टाकत ३ महिलांची सुटका केली.
Pune Crime: स्पा सेंटरवरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, पोलिसांनी छापा टाकला; ३ महिलांना नको त्या अवस्थेत पकडलं
Pune CrimeSaam Tv
Published On
  • पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

  • कोंढव्यात स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा

  • बीजी लोणकर रोडवरील स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय

  • पुण्यात स्पा सेंटरच्या मॅनेजरला अटक

  • कोंढवा स्पा सेंटरमधून तीन महिलांची सुटका

पुण्यामध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला. कोंढव्यामधील बी. जी लोणकर रोडवरील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी धाड टाकली. याठिकाणी पोलिसांना ३ महिला आढळून आल्या. या महिलांना जबरदस्ती या व्यवसायात ओढले असल्याची माहिती समोर आली. या सर्व महिलांची पोलिसांनी सुटका केली. पोलिसांनी या स्पा सेंटरच्या मॅनेजरला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातल्या कोंढव्यामधील रिफ्रेश स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला. याठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी या स्पा सेंटरवर एका बनावट गिऱ्हाईकाला पाठवले. त्यावेळी तिथे अवैधरित्या देह विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले. याठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला.

Pune Crime: स्पा सेंटरवरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, पोलिसांनी छापा टाकला; ३ महिलांना नको त्या अवस्थेत पकडलं
Pune Accident Black Spot: पुणे शहरासह जिल्ह्यात अपघात वाढले! जीवघेणे ६३ ब्लॅक स्पॉट; 'या' रस्त्यांवर होतात सर्वाधिक अपघात

या स्पा सेंटरवर तीन महिला होत्या. त्यांची चौकशी केली असता त्यांनी वेश्या व्यवसाय केला जात असल्याचे सांगितले. पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करून जबरदस्ती केली जात असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी या प्रकरणी स्पा सेंटरच्या मॅनेजरविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. हा मॅनेजर मूळचा नागालँडचा आहे.

Pune Crime: स्पा सेंटरवरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, पोलिसांनी छापा टाकला; ३ महिलांना नको त्या अवस्थेत पकडलं
Pune Accident Black Spot: पुणे शहरासह जिल्ह्यात अपघात वाढले! जीवघेणे ६३ ब्लॅक स्पॉट; 'या' रस्त्यांवर होतात सर्वाधिक अपघात

स्पा सेंटरच्या मॅनेजरविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १४३ व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ४, ५, ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. या व्यवसायात आणखी कुणाचा समावेश आहे याचा शोध घेतला जात आहे. या कारवाईनंतर परिसरात खळबळ उडाली.

Pune Crime: स्पा सेंटरवरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, पोलिसांनी छापा टाकला; ३ महिलांना नको त्या अवस्थेत पकडलं
Pune Crime: दहावीत चांगले मार्क्स मिळवून देतो..., भोंदूबाबाकडून १४ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण, पुणे हादरले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com