पुणे: पुण्यात भरवस्तीत चंदनाच्या झाडांची चोरी होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरालगतच्या मांजरी परिसरात एका सहकारी गृहरचना सोसायटीतून चंदनाच्या झाडांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना सुमारे आज पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्ग लगत असलेल्या सोसायटीत पहाटे एका पांढऱ्या कारमधून तीन तरुण आले. त्यांनी प्रवेशद्वार क्रमांक दोनवर सुरक्षारक्षकाला धमकावत सोसायटीत प्रवेश केला. यानंतर क्लब हाऊसमधील मोकळ्या जागेत असलेली पूर्ण वाढ झालेली वाढ दोन चंदनाची झाडे त्यांनी अवघ्या 10 ते 15 मिनिटांत कापून टाकली. झाडांची खोडे उचलून त्यांनी प्रवेशद्वार क्रमांक 1 मधून बाहेर जात कारमध्ये टाकली आणि घटनास्थळावरून पसार झाले.
दरम्यान या घटनेनंतर सोसायटीकडून मंजरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत असून अधिक तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.