गरीबीमुळं रुग्णालयानं नाकारलं, रस्त्यातच डॉक्टरांनी केली महिलेची प्रसूती, शिरूरमधील संतापजनक घटना

Poor Pregnant Woman Denied Hospital Gives Birth On Road Shirur: शिरूरमध्ये गरीब महिलेला रुग्णालयाने नाकारल्यानंतर भररस्त्यातच प्रसूती झाली. स्थानिक महिला, नागरिक आणि डॉक्टरांच्या तत्परतेमुळे आई आणि बाळ दोघांचेही प्राण वाचले. माणुसकीचे हृदयस्पर्शी उदाहरण.
Locals and a doctor assist a poor pregnant woman during an emergency roadside delivery in Shirur, saving both mother and newborn.
Locals and a doctor assist a poor pregnant woman during an emergency roadside delivery in Shirur, saving both mother and newborn.Saam tv
Published On

रोहिदास गाडगे, साम टीव्ही

पुणे-शिरूर: माणुसकी अजुनही जीवंत असल्याचे दर्शन शिरूर शहरात घडले आहे. शहरातील गजबजलेल्या निर्माण प्लाझा परिसरात प्रसूती कळा तीव्र झाल्याने एका गरीब गर्भवती महिलेची भररस्त्यातच प्रसूती झाली. मात्र कोणतीही भीती किंवा संकोच न बाळगता स्थानिक नागरिक, महिला आणि महिला डॉक्टरांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आई आणि बाळ दोघांचेही प्राण वाचले आहेत.

Locals and a doctor assist a poor pregnant woman during an emergency roadside delivery in Shirur, saving both mother and newborn.
Mumbai Pune : मुंबई-पुणे प्रवास १ तासाने कमी होणार, ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला निर्माण प्लाझा परिसरातून जात असताना तिला अचानक तीव्र प्रसूती कळा सुरू झाल्या. परिस्थिति इतकी गंभीर होती की तिला रस्त्यावर बसली. काही क्षणांतच तिने बाळाला जन्म दिला. रस्त्यावरील हा प्रकार पाहून सुरुवातील नागरिक थबकले, मात्र परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मदत करू लागले.

Locals and a doctor assist a poor pregnant woman during an emergency roadside delivery in Shirur, saving both mother and newborn.
Pune Railway Station: स्लिपींग पॉड्स, AC लाउंज, वाय-फाय अन् बरंच काही; पुणे रेल्वे स्टेशनवर फक्त ४० रुपयांत राहायची सोय

साड्यांचा आडोसा अन् डॉक्टरांची तत्परता

घटनेची माहिती मिळताच परिसरातील महिलांनी आणि नगरसेविका पूजा पोटावळे यांनी तात्काळ धाव घेतली. रस्त्यावरच साड्या आणि स्कार्पचा आडोसा धरून एक सुरक्षित वातावरण तयार करण्यात आले. त्याचवेळी डॉक्टर सुनीता पोटे यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून वैद्यकीय सूत्रे हाती घेतली. त्यांनी अत्यंत कौशल्याने नवजात बाळाची तपासणी करून त्याला सुरक्षितपणे रडवले, हे प्रसूतिनंतर बाळाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे असते.

Locals and a doctor assist a poor pregnant woman during an emergency roadside delivery in Shirur, saving both mother and newborn.
Pune | दोन पैकी एक जागा आम्हाला द्या - ठाकरे गटाची काँग्रेसकडे मागणी

प्रसूतिनंतर आई आणि नवजात बाळाला तातडीने उपचारांसाठी मिरा नर्सिंग होम येथे दाखल करण्यात आले. रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आणि स्थिर आहे. या संकटकाळात पत्रकार, स्थानिक व्यावसायिक आणि महिलांनी जो संयम आणि माणुसकी दाखवली, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. भररस्त्यात घडलेल्या या घटनेत वेळेवर मदत मिळाली नसती तर अनर्थ घडला असता; मात्र शिरूरकरांच्या तत्परतेमुळे आज एका माऊलीच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे.

गरिबीमुळे रुग्णालयाने नाकारलं? आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्न

पुण्याच्या शिरूर शहरात घडलेल्या रस्त्यावर प्रसूतीच्या घटनेने आता वेगळंच वळण घेतलं आहे…प्रसूती झालेल्या महिलेने खाजगी आणि सरकारी रुग्णालयांनी केवळ गरिबीमुळे उपचार नाकारल्याचा गंभीर आरोप केलाय.या आरोपांमुळे केवळ एक घटना नाही, तर संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.माणुसकीच्या जोरावर रस्त्यावर प्रसूती पार पडली खरी, पण रुग्णालयांची दारं बंद का होती, हा खरा सवाल आता समोर येतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com