

पुणे रेल्वे स्टेशनवर स्लिपिंग पॉड्स अन् एसी लाउंज
रेल्वे स्टेशनच्या पहिल्या मजल्यावर सुविधा सुरु
किंमत फक्त ४० रुपयांपासून सुरु
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता पुण्याला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन सुविधा सुरु केली जाणाक आहे. पुणे रेल्वे स्थानकावर आता स्लीपिंग पॉड्स आणि एसी एक्झिक्युटिव्ह लाउंजचा वापर करता येणार आहे. ही सुविधा २४ मार्च २०२६ पासून सुरु करण्यात आली आहे. पुणे रेल्वे स्टेशनच्या पहिल्या मजल्यावर ही सुविधा सुरु करण्यात आलेली आहे.
एनएफआर मॉडेलअंतर्गत हा प्रकल्प विकसित केलेला आहे. हा प्रकल्प खासगी ऑपरेटरमार्फत उभारण्यात आला आहे. यासाठी रेल्वेला ३६,००,००२ रुपये वार्षिक परवाना शुल्क दिले जाते. याबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. स्थानक परिसरात परवडणारे आणि विश्रांतीचे चांगले पर्याय उपलब्ध करुन देणे हा या सुविधेचा उद्देश आहे.
पुणे रेल्वे स्टेशनवरील एसी एक्झिक्युटिव्ह लाउंजमध्ये २६ स्लीपिंग पॉड्स, १७ सोफा सेट आहेत. या ठिकाणी एसी आसनव्यवस्था, टेलिव्हिजन डिस्प्ले, वाय-फाय, मोबाईल चार्जिंग, लॉकर्स, सीसीटीव्ही, स्वच्छतागृह, गीझर अशा अनेक सुविधा आहेत.
किंमत किती?
या लाउंजची किंमती प्रति तास ४० रुपये आहे. स्लिपिंग पॉड्स हे तयांच्या श्रेणीनुसार उपलब्ध असणार आहेत. तीन तासासाठी ३०० रुपये, सहा तासांसाठी ४००, नऊ तासांसाठी ५०० तर १२ तासांसाठी ६०० रुपये आणि २४ तासांसाठी १,२०० रुपये लागणार आहेत. या बुकिंग लाउंजसाठी तुम्ही ऑनलाइन आरक्षण करु शकत नाही. तुम्हाला तिथे जाऊनच बुकिंग करावे लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.