

गुजरात आणि उत्तर भारतातील विविध मार्गांवर या गाड्या धावतील.
वाढत्या प्रवासी गर्दीमुळे ५ उन्हाळी स्पेशल गाड्या चालवण्याची घोषणा
या गाड्या जुलै महिन्यापर्यंत धावणार असून एकूण १५० फेऱ्या होणार आहेत.
बहुतेकजण उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने आपापल्या गावी किंवा इतर राज्यांमध्ये फिरण्याकरता जाण्याची योजना आखतात. त्यामुळे उन्हाळ्यात प्रवाशांची संख्या अधिक असते. ही प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत पश्चिम रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातसह उत्तर भारतातील विविध ठिकाणांदरम्यान पाच उन्हाळी स्पेशल ट्रेनची घोषणा केली आहे.
या पाच गाड्यांच्या जुलै महिन्यापर्यंत प्रत्येकी ३० प्रमाणे एकूण १५० फेऱ्या चालविण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे. त्यानुसार मध्य रेल्वेकडून ४६अतिरिक्त विशेष सेवा तर पश्चिम रेल्वेकडून ५ उन्हाळी स्पेशल गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई आणि मडगाव दरम्यान २० सेवा तसेच मुंबई आणि संतरागाछी दरम्यान २६ सेवा चालवली जाणार आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०२२००/०२१९९ वांद्रे टर्मिनस-वीरंगना लक्ष्मीबाई झाँसी उन्हाळी स्पेशल सुपरफास्ट एक्सप्रेस ०४ एप्रिल ते ११ जुलै पर्यंत धावणार. ही रेल्वे दर शनिवारी वांद्रे टर्मिनस येथून सकाळी ०५:१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०५:०० वाजता वीरंगना लक्ष्मीबाई झाँसी येथे पोहोचणार आहे.
ट्रेन क्रमांक ०४१२६/०४१२५ वांद्रे टर्मिनस-सुभेदारगंज उन्हाळी विशेष सुपरफास्ट एक्सप्रेस ०७ एप्रिल ते १४ जुलैपर्यंत धावेल. ही गाडी दर मंगळवारी सकाळी ११:१५ वाजता वांद्रे टर्मिनस येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ०५:०० वाजता सुभेदारगंजला पोहोचणार आहे.
ट्रेन क्रमांक ०५१८४/०५१८३ वांद्रे टर्मिनस-आझमगड सुपरफास्ट स्पेशल एक्सप्रेस ०६ एप्रिल ते १३ जुलै पर्यंत धावेल. ही गाडी दर सोमवारी वांद्रे टर्मिनस येथून सकाळी १०:४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ०८:१० वाजता आझमगडला पोहोचणार
ट्रेन क्रमांक ०५०३४/०५०३३ वांद्रे टर्मिनस - गोमती नगर स्पेशल ट्रेन ०७ एप्रिल ते १४ जुलै पर्यंत धावेल. ही गाडी दर मंगळवारी वांद्रे टर्मिनस येथून रात्री ११:०० वाजता सुटेल आणि गुरुवारी सकाळी ०७:४५ वाजता गोमती नगरला पोहोचेल.
ट्रेन क्रमांक ०५०१८/०५०१७ वलसाड - माऊ विशेष ट्रेन ०५ एप्रिल ते १२ जुलै पर्यंत धावेल. ही गाडी दर रविवारी वलसाड स्थानकावरून दुपारी ०३:१० वाजता वलसाडहून सुटेल आणि मंगळवारी रात्री १२:४५ वाजता माऊ येथे पोहोचेल.
मुंबई वांद्रे टर्मिनस येथून सुटणाऱ्या ट्रेन क्रमांक ०२२००, ०४१२६, ०५१८४, ०५०३४ आणि वलसाड येथून सुटणाऱ्या ट्रेन क्रमांक ०५०१८ साठी तिकिटांचे आरक्षण ३१ मार्च पासून सर्व PRS काउंटरवर आणि आयआरसीटीसी वेबसाइटवर सुरू होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.