

Digital Gold Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयाच्या दिवशी सोन्याची खरेदी करणं शुभ मानले जाते. पण सध्या सोन्याच्या किंमती अवाक्याबाहेर गेल्या आहेत. सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा दीड लाखांच्या पार पोहचले आहेत. पण तुम्हाला फक्त १ रूपयात २४ कॅरेट सोनं खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. पण हे सोनं डिजिलिट प्लॅटफॉर्मवर खरेदी करावे लागेल.
सोन्याच्या किंमती दीड लाखांच्या पार पोहचल्या आहेत. त्यामुळे अक्षय्य तृतीया अथवा इतर सणासुदीला सोनं खरेदी करणं आपल्या खिशाला परवडणारे नाही. पण डिजिटिल सोनं खूपच कमी किंमतीत खरेदी करता येतं. डिजिटल सोनं खरेदी करून अक्षय्य तृत्याचा सण उत्साहात साजरा करता येणार आहे. फक्त एक रूपयांमध्ये तुम्ही Paytm, PhonePe, Jio Finance यासारख्या प्लॅटफॉर्मवर २४ कॅरेट सोन्याची खरेदी करू शकता. या प्लॅटफॉर्मवर सोनं खरेदीवर अनेक ऑफरही देण्यात आल्या आहेत. पण हे डिजिटल सोनं खरेदी करायचं कसं? डिजिटल गोल्डमध्ये नेमकं काय? थोडक्यात समजून घेऊयात...
डिजिटल गोल्डमध्ये तुम्ही २४ कॅरेट (९९.९९ टक्के) शुद्ध सोनं ऑनलाइन खरेदी करू शकता. हे सोनं घरात ठेवण्याची गरज नाही. तर सुरक्षित इंश्योर्ज वॉल्ट स्टोअरमध्ये हे सोनं राहाते. हे सोनं चोरी होऊ शकते, अशी चिंता, टेन्शन घेण्याची गरज नाही. हे सोनं तुम्ही कधीही करू शकता. ऑनलाइन पैसे दिल्यानंतर तुमच्या नावावर सोनं जमा होणार आहे. त्याशिवाय कोणत्याही क्षणी हे सोनं विकताही येते. तुमच्या खात्यावर तात्काळ पैसे जमा होतील. डिजिटल गोल्ड तुम्ही एक रूपयांपासून खरेदी करू शकता. तुम्ही गरजेनुसार नाण्यांच्या स्वरूपात याची डिलिव्हरी घेऊ शकता.
Jio Finance : १% अतिरिक्त सोने आणि लकी ड्रॉ
१९ एप्रिल ते २१ एप्रिल यादरम्यान २००० रुपये किंवा त्याहून अधिक किमतीच्या डिजिटल सोन्याच्या खरेदीवर १% अतिरिक्त सोने (कमाल १००० रुपयांपर्यंत) मिळेल. ₹5,000 पेक्षा जास्त खरेदीवर दुप्पट जिओ पॉइंट्स आणि ₹10,000 पेक्षा जास्त गुंतवणुकीवर मेगा ड्रॉमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. यात ५ विजेत्यांना 1 ग्रॅम सोने जिंकण्याची संधी आहे.
PhonePe: 24 K शुद्ध आणि एसआयपी सुविधा
फोनपे आपल्या प्लॅटफॉर्मवर एमएमटीसी-पॅम्प आणि सेफगोल्ड (SafeGold) सारख्या विश्वसनीय भागीदारांमार्फत सोन्याची विक्री करते. तुम्ही ९९.९९% शुद्धतेचे २४-कॅरेट सोने खरेदी करू शकता . एक वेळच्या खरेदीशिवाय तुम्ही दैनिक किंवा मासिक एसआयपी (SIP) देखील सुरू करू शकता.
Paytm: डिजिटल गोल्ड आणि होम डिलिव्हरी
पेटीएमने प्रत्यक्ष डिलिव्हरीची सुविधा देखील सुरू केली आहे. त्यामुळे डिजिटल सोन्याची व्याप्ती आणखी वाढवली आहे. पेटीएम गोल्डमध्ये तुम्ही १ रुपयापासून गुंतवणूक सुरू करू शकता. १२,००० पेक्षा जास्त पिन कोडवर सोन्याच्या नाण्यांची घरपोच डिलिव्हरी देखील देतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.