भाजप आमदाराच्या मुलाने ५ जणांना उडवले, व्हिडिओ काढणाऱ्यांनाही धमकावले, धक्कादायक प्रकार

Madhya Pradesh political accident controversy : मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे भाजप आमदार प्रीतम सिंग लोधी यांच्या मुलाने भरधाव एसयूव्हीने ५ जणांना धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Madhya Pradesh political accident controversy
Madhya Pradesh political accident controversy Saam TV Marathi News
Published On

BJP MLA son Dinesh Lodhi accident case details : भाजप आमदाराच्या मुलाने भरधाव एसयूव्हीने ५ जणांना उडवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे, हा प्रकार कॅमेऱ्यात कैद करणाऱ्यांनाही त्याने धमकावल्याचे बोलले जात आहे. प्रकरण चिघळल्यानंतर पोलिसांनी आरोपी आमदार पुत्राच्या (Dinesh Lodhi accident case) विरोधात गुन्हा दाखल तपास सुरू केला आहे. मध्य प्रदेशमधील शिवपुरी जिल्ह्यात ही घटना घडली. प्रीतम सिंह लोधी हे पिछोरे विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत. त्यांचा मुलगा दिनेश लोधी याच्यावर या अपघाताप्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.(BJP MLA son Dinesh Lodhi accident case details)

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने दुचाकीवरून जाणाऱ्या तीन मजुरांना आणि रस्त्यावरून चालणाऱ्या दोन महिलांना धडक दिली. दिनेश लोधी याच्या अलिशान गाडीने ५ दुचाकीला आणि रस्त्याने चालणार्‍यांना जोरात धडक दिली. दिनेश लोधी याच्या गाडीच्या धडकेत ५ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी दिनेश लोधी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचे सीसीव्ही तपासण्यात येत आहे.

Madhya Pradesh political accident controversy
हृदयद्रावक! वाढदिवसाच्या दिवशीच रिलस्टार सोनाली जाधवचा शेवट; अनैतिक संबंधातून प्रियकरानेच संपवले

दिनेश लोधी याच्या गाडीच्या धडकेत संजय परिहार, आशिष परिहार, अंशुल परिहार, सीता वर्मा आणि पूजा सोनी हे ५ जण जखमी झाले आहेत. लोथी यांच्याविरोधात संजय परिहार यांनी पोलिसांत तक्रार दिली. ते म्हणाले की, आशिष आणि अंशुलसोबत ते कामासाठी दुचाकीवरून थानरा गावाकडे जात होते. त्यावेळी समोरून चालणाऱ्या दोन महिलांना आणि त्यांच्या मोटारसायकलला मागून येणाऱ्या अलिशान थारने जोराची धडक दिली.

Madhya Pradesh political accident controversy
Sahar Sheikh : कैसे हराया... नॉट रिचेबल सहर शेख चक्क वानखेडे स्टेडियमवर, व्हिडिओ पोस्ट करत म्हणाल्या...

पोलिसांनी दिनेश लोधी याच्यावर विविध कलमांअतर्गंत गुन्हा दाखल केला आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीने चालवलेली गाडी आम्ही ताब्यात घेतली आहे. या प्रकरणात दिनेश लोधी यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तर भाजप आमदार प्रीतम सिंग लोधी यांनी पोलिसांना सांगितले की, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही आणि आरोपी त्यांचा स्वतःचा मुलगा असला तरी त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. एका आमदारासाठी जनता अधिक महत्त्वाची आहे. मला आशा आहे की पोलीस प्रशासन करेरा येथील पीडितांना न्याय देईल, असे आमदार लोधी म्हणाले.

Madhya Pradesh political accident controversy
अमोल मिटकरी पुन्हा आमदार होणार? राष्ट्रवादीच्या वाट्याला विधान परिषदेच्या किती जागा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com