Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे पुन्हा आमदार होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra Legislative Council election : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीत उमेदवारीवरून संघर्ष वाढला आहे. उद्धव ठाकरे उमेदवार असतील तरच पाठिंबा देण्याची काँग्रेसची अट समोर आली.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaam TV Marathi
Published On

Uddhav Thackeray legislative council election 2026 news : विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये उमेदवाराच्या नावावरून रस्सीखेच सुरू असल्याचे समोर येत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीबाबत मित्रपक्षांमध्ये वेगवेगळी मते पाहायला मिळत आहेत. त्यामुळे उमेदवारी कुणाला मिळणार? याची चर्चा सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार का? की मविआत फूट पडणार? नेमकं तिकीट कुणाला मिळणार? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना मैदानात उतरणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीवेळी ठाकरेंच्या शिवसेनेने शरद पवार यांना पाठिंबा दिला होता. त्याचवेळी पवारांकडून विधान परिषदेसाठी ठाकरेंना सपोर्ट करणार असल्याचे निश्चित झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, आता उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर काँग्रेसकडूनही पाठिंबा दिला जाणार असल्याचे समजते आहे. पण दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी निवडणूक न लढवण्याची आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यामुळे ठाकरेंच्या उमेदवारीवर निवडणूक बिनविरोध होणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे. कारण, काँग्रेसने ठाकरे उमेदवार असतील तरच पाठिंबा देणार असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे.

Uddhav Thackeray
अमोल मिटकरी पुन्हा आमदार होणार? राष्ट्रवादीच्या वाट्याला विधान परिषदेच्या किती जागा?

उद्धव ठाकरेंची भूमिका :

खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे हे निवडणूक न लढवण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांच्या जागी पक्षाकडून अंबादास दानवे, सुषमा अंधारे अथवा विनायक राऊत यांच्या नावाची चर्चा आहे. सध्याच्या स्थितीला अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्याचे संकेत मिळत आहेत. पण उद्धव ठाकरे आपल्या निर्णयावर ठाम राहणार की मित्रपक्षांच्या आग्रहाखातर उमेदवारी स्वीकारणार? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Uddhav Thackeray
नाशिक, अमरावतीनंतर आता जालन्यात अकरावीच्या मुलीवर अत्याचार; बुरखा घालून घरी न्यायचा अन्...

काँग्रेसची अट काय?

विधान परिषद निवडणुकीआधी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करून एक अट घातली आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार का? याची चर्चा सुरू झाली. उद्धव ठाकरे स्वतः उमेदवार असतील, तरच काँग्रेस पक्ष त्यांच्या उमेदवारीचा सहानुभूतीपूर्वक विचार करेल, असे काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा चेहरा असून त्यांनी मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व केले आहे. त्यामुळे त्यांनी विधान परिषदेत जाणे ही आनंदाची बाब असेल, असेही त्यांनी नमूद केले.

Uddhav Thackeray
Gold Rate Today : अखेर सोन्याच्या दरात मोठी घसरण, अक्षय्य तृतीयेला करा खरेदी; 24k, 22k, 18k गोल्डचे ताजे दर

ठाकरेंच्या शिवसेनेकडून दुसरा उमेदवार?

उद्धव ठाकरे यांनी स्वतः निवडणूक न लढवण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेनेकडून अंबादास दानवे, सुषमा अंधारे आणि विनायक राऊत यांच्या नावाची चर्चा आहे. विधान परिषदेच्या ९ जागांपैकी मविआच्या वाट्याला एक जागा येणार आहे. या जागेवर शिवसेनेकडून दावा ठोकण्यात येत आहे. पण उमेदवार कोण आहे? यावर अद्याप स्पष्टता आलेली नाही. खासदार संजय राऊत यांनी यावर सूचक संकेत दिले आहेत.

विरोधी पक्षाचा एकच उमेदवार विधान परिषदेवर जाईल. माझ्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे जर पुन्हा उमेदवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होईल. आता मविआकडून, खासकरून शिवसेनेकडून काय भूमिका घ्यायची, या संदर्भात आम्ही दोन दिवसांत निर्णय घेऊ
संजय राऊत, खासदार शिवसेना (ठाकरे गट)
Uddhav Thackeray
हृदयद्रावक! वाढदिवसाच्या दिवशीच रिलस्टार सोनाली जाधवचा शेवट; अनैतिक संबंधातून प्रियकरानेच संपवले

उमेदवारीवरून MVA मध्ये खदखद; उद्धव ठाकरे यांना संधी मिळणार का? भाजप काय म्हणाले?

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत उमेदवारीवरून मोठा संघर्ष सुरू असल्याचा दावा नवनाथ बन यांनी केला. मागील वेळी राष्ट्रवादीला संधी मिळाल्यानंतर यावेळी काँग्रेस उमेदवारीसाठी आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना संधी मिळेल का, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. विरोधकांचे संख्याबळ मर्यादित असल्यामुळे फक्त एकाच उमेदवाराचा विजय शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेतील ठाकरे यांच्या कामगिरीवरही प्रश्न उपस्थित करत, त्यांना पुन्हा संधी मिळेल का याकडे सर्वांचे लक्ष लागल्याचे त्यांनी नमूद केले.

Uddhav Thackeray
Sahar Sheikh : कैसे हराया... नॉट रिचेबल सहर शेख चक्क वानखेडे स्टेडियमवर, व्हिडिओ पोस्ट करत म्हणाल्या...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com