Crime: जळगाव हादरले! ३० वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार, आधी अपहरण, नंतर मारहाण करत आरोपींचं भयंकर कृत्य

Jalgaon Crime News: जळगावमध्ये ३० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. ६ जणांनी महिलेसोबत भयंकर कृत्य केले. या घटनेमुळे जळगाव हादरले.
Crime: जळगाव हादरले! ३० वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार, आधी अपहरण, नंतर मारहाण करत आरोपींचं भयंकर कृत्य
Jalgaon Crime Newssaam tv
Published On
  • जळगावच्या जामनेरमध्ये भयंकर घटना

  • ३० वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार

  • ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला

  • अपहरण, मारहाण, सामूहिक लैंगिक अत्याचार आणि धमकीचे आरोप

संजय महाजन, जळगाव

जळगावमध्ये ३० वर्षीय विवाहितेवर ६ जणांनी सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगावच्या जामनेर तालुक्यात ही घटना उघडकीस आली. आरोपींनी पीडित महिलेचे अपहरण केलं, नंतर मारहाण करत तिच्यासोबत भयंकर कृत्य केले. या घटनेमुळे जळगाव जिल्हा हादरला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या जामनेरमध्ये ४ जणांनी विवाहितेवर सामूहिक बलात्कार केला. महिला रस्त्याने पायी चालत जात होती. त्यावेळी दोन आरोपींनी तिला जबरदस्ती आपल्या कारमध्ये बसवून जवळच्या ओढ्याजवळ नेले. त्याठिकाणी ६ जणांनी महिलेवर आळीपाळीने बलात्कार केला. घटनेचा व्हिडीओ तयार करून आरोपींनी तिला धमकी दिली. यावेळी आरोपींनी पीडित महिलेला मारहाण करत जीवे मारण्याची देखील धमकी दिली.

Crime: जळगाव हादरले! ३० वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार, आधी अपहरण, नंतर मारहाण करत आरोपींचं भयंकर कृत्य
Crime News: मुंडकं छाटलं, दोन्ही हात तोडले; निर्जनस्थळी फेकला मृतदेह, ठाण्यातील हत्याकांडानं महाराष्ट्र हादरला

या प्रकरणी फत्तेपूर पोलिस ठाण्यात ६ जणांविरुद्ध सामूहिक बलात्कार, अपहरण, दुखापत, धमकी तसेच शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेला भीती दाखवून अत्याचार केल्याचा आरोप देखील पीडित महिलेने तक्रारीत नमूद आहे. अत्याचाराचा व्हिडिओही व्हायरल करण्याची धमकी देत वर्षभरापासून आरोपींनी वेळोवेळी अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

Crime: जळगाव हादरले! ३० वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार, आधी अपहरण, नंतर मारहाण करत आरोपींचं भयंकर कृत्य
Crime: १३ वर्षीय भाचीचं अपरहण, शेतात नेऊन मामाकडून बलात्कार; नंतर गळा दाबून संपवलं

पीडित महिला आणि आरोपी हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. आरोपींपैकी एकाचा ट्रॅक्टर भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. पीडितेच्या नवऱ्याकडे ट्रॅक्टरच्या भाड्याने १ लाख रुपये थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. आरोपींचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, २० दिवसांतील जामनेर तालुक्यातील महिलेवर अत्याचाराची दुसरी घटना असून जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Crime: जळगाव हादरले! ३० वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार, आधी अपहरण, नंतर मारहाण करत आरोपींचं भयंकर कृत्य
Pune Crime: बांधकाम व्यावसायिक आत्महत्या प्रकरणात मोठी कारवाई, पुण्यातील माजी आमदार- नगरसेवकासह १४ जणांविरोधात गुन्हा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com