Crime News: नागपूर हादरले! विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, अश्लिल व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची धमकी

Nagpur Crime: नागपूरमध्ये विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. ड्रग्ज देत या महिलेसोबत आरोपींनी भयंकर कृत्य केले. आरोपी सध्या फरार आहेत.
Crime News: नागपूर हादरले! विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, अश्लिल व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची धमकी
Nagpur Crime Saam Tv
Published On
  • नागपूरच्या खापरखेडा भागात विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार

  • आरोपींनी ड्रग्जचे व्यसन लावून नशेत असताना महिलेसोबत केलं भयंकर कृत्य

  • अश्लील फोटो-व्हिडीओ काढत महिलेला आरोपींनी ब्लॅकमेल केलं .

  • व्हिडीओ व्हायरल करण्याची आणि नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी देत वारंवार अत्याचार

नागपूरमध्ये विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरच्या खापरखेडा भागात ही घटना घडली. दोन तरुणांनी महिलेसोबत मैत्री केली. या तरुणांनी महिलेला ड्रग्जची सवयी लावली. त्यानंतर नशेच्या अवस्थेत आरोपींनी फायदा घेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

आरोपींनी पीडितेचे अश्लिल फोटो आणि व्हिडीओ मोबाईलमध्ये शूट केले. या फोटो आणि व्हिडीओद्वारे आरोपी पीडित महिलेला ब्लॅकमेल करत होते आणि धमकी देत होते. महिलेने घाबरून ही गोष्ट कुणालाच सांगितली नाही. आरोपींनी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला.

पीडितेने दिलेल्या तक्रारीत असे सांगितले की, आरोपींनी तिच्या नवऱ्याला झोपेच्या गोळ्या देऊन भेटण्यासाठी दबाव टाकला. जेव्हा तिने विरोध केला तेव्हा त्यांनी तिच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून खापरखेडा पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपी सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Crime News: नागपूर हादरले! विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, अश्लिल व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची धमकी
Delhi Crime: दिल्ली हादरली! १० वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, मृतदेह जंगलात नेऊन फेकला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या तक्रारीच्या आधारे आरोपी अनुराग कटारिया आणि आशिष शास्त्री यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये एका कम्प्युटर क्लासेसमध्ये पीडित महिलेची आरोपी अनुरागशी भेट झाली. त्यांची मैत्री वाढत असताना अनुरागने तिला ड्रग्जची सवयी लावली. हळूहळू महिलेला ड्रग्जचे व्यसन लागले. त्यानंतर अनुरागने पीडित महिलेची भेट त्याचा मित्र आशिष याच्याशी करून दिली.

Crime News: नागपूर हादरले! विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, अश्लिल व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची धमकी
Crime: १२ वर्षीय मुलीचे अपहरण करून बलात्कार, हत्या करत मृतदेह तलावात फेकला

पीडितेने असाही आरोप केला आहे की, दोन्ही आरोपींनी तिला त्यांच्या घरी नेले आणि ड्रग्जच्या नशेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेवेळी आरोपींनी पीडित महिलेचे अश्लील व्हिडिओ बनवले. त्यानंतर हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. पीडितेने या प्रकरणी न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. फरार आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. या घटनेमुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे.

Crime News: नागपूर हादरले! विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, अश्लिल व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची धमकी
Crime News: स्मार्ट सिटी दाखवतो म्हणत सोबत नेलं, खोलीत कोंडून ठेवत ४ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार नंतर...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com