

ठाण्यातील शीळ-डायघर येथे 23 वर्षीय तरुणाची हत्या
जुन्या वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज
या प्रकरणी दोन भावांना पोलिसांनी अटक केली आहे.
विकास काटे, साम प्रितिनिधी
ठाण्यातील शीळ धक्कादायक घटना घडली आहे. जुन्या वादातून एका 23 वर्षीय तरुणाची निर्घुणपणे हत्या झाली. मुंडकं धडा वेगळं केलं, दोन्ही हात तोडून त्याचा मृतदेह निर्जनस्थळी फेकून दिला. इतकेच नाही तर हत्या करताना व्हिडिओ देखील बनवला. याप्रकरणी दोन भावाना अटक करण्यात आली आहे. फैज सुलतान मालीम, अल्बान सुलतान मालीम अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही ठाण्यातील शीळ डायघर येथे राहत.
जुना वादाच्या कारणातून या सुलतान मालीन आणि त्याचा भाऊ अल्बान मालीन यांनी अमन मुस्तकीन शेख या २३ वर्षीय तरुणाची हत्या केली. हत्या केल्यानंतर त्याचे मुंडकं धडापासून वेगळं केलं. आणि त्याचे दोन्ही हात तोडून त्याचे प्रेत निर्जनस्थळी टाकून दिला होता. विशेष म्हणजे हत्या करतानाचा व्हिडिओ सुद्धा बनवला. फैज आणि अल्बान या दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली. पोलिसांना कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी 13/3/2026 रोजी अमन शेख या इसमाचा खून केल्याचे कबूल केलं.
13 मार्च 2026 रोजी रात्री 9 वाजता अमन शेखला श्रीलंका एरिया, मुंब्रा या परिसरातून रिक्षामध्ये बसवलं. नंतर त्याला निर्जनस्थळी नेऊन त्याचा धारधार चाकूने गळा चिरला. त्यानंतर मयताची ओळख पटू नये म्हणून प्रेताचे मुंडके धडापासून वेगळे केले. खर्डीगांव येथे मृतदेह टाकून दिला. मृतदेहाचे दोन्ही हात कापले.
तसेच अमनची हत्या करताना आरोपींनी त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट सुद्धा केला होता. तो मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. अटक आरोपी फैज सुलतान मालीम याच्यावर यापूर्वी देखील एका अल्पवयीन मुलाची हत्या केली आहे. मुंब्रा पोलीस ठाणे 363,302 323,324, प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.