Beed Crime: मुलीला का मारले? जाब विचारताच ५० वर्षीय महिलेच्या डोक्यात घातली वीट

Beed Crime News: बीडमधील अंबाजोगाई येथे एका धक्कादायक घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. आपल्या मुलीवर झालेल्या हल्ल्याबाबत जाब विचारणाऱ्या एका महिलेवर वीट आणि काठ्यांनी हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. पीडितेचे कुटुंबीय आरोपींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
Beed Crime
Beed CrimeSaam tv
Published On
Summary
  • अंबाजोगाईतील चनई वडार वस्ती परिसरात धक्कादायक हल्ल्याची घटना घडली.

  • महिलेवर वीट आणि काठीने हल्ला झाल्याचा आरोप

  • भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या महिलेलाही मारहाण झाल्याची माहिती

बीड जिल्हा गुन्हेगारीच्या घटनांमुळे पुन्हा चर्चेत आलाय. कधी एखाद्या कामगाराला मारहाण, तर कधी हॉटेल व्यवसायिकावर जीवघेणा हल्ला,अशा सतत घडणाऱ्या घटनांमध्ये नागरिकांमध्ये भीती आणि दहशतीचं वातावर आहे. मुलीला का मारलं म्हणून जाब विचारणाऱ्या एक वृद्ध महिलेला विटा आणि काठीनं मारहाण झालीय. ही घटना अंबाजोगाई येथील चनई वडार वस्ती परिसरात घडलीय. याप्रकरणी आरोपींच्या अटकेसाठी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या केला आहे.

Beed Crime
Raigad Crime: रायगड हादरलं! झोपलेल्या ५ वर्षाच्या मुलीचं अपहरण, नंतर घेतला जीव, ताब्यात घेतलेला संशयित कोण?

यशोदा बालाजी राठोड असे मृत महिलेचे नाव असून या महिलेच्या मुलीला आरोपीने मारहाण केली होती.माझ्या मुलीला का मारलं? असा जाब विचारल्याच्या कारणावरून यशोदा राठोड यांना विटेने आणि काठीने मारहाण करण्यात आली. मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेली असता सुभाष लष्करे नावाच्या व्यक्तीने त्यांना शिवीगाळ करत वीट फेकून मारली. हे भांडण सोडवायला गेलेल्या राणी राठोड यांनाही आरोपीच्या मुलांनी काठीने बेदम मारहाण केली.

या मारहाणप्रकरणी राणी बालाजी राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सुभाष लष्करे, मंदाकिनी सुभाष लष्करे, विश्व सुभाष लष्करे आणि इंद्र सुभाष लष्करे या चौघांविरोधात अंबाजोगाई शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या खून प्रकरणातील एक आरोपी अटक असून उर्वरित तीन आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी मयत महिलेच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोल केलं.

सासूच्या डोक्यात फळी घातली

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात रेहेळ-गावणवाडी येथे ही घडली आहे. या गावात रहिवासी असलेले नाचरे कुटुंबातील सुवर्णा नाचरे (वय ७१) यांनी आपली सून मयुरी नाचरे हिला सकाळी लवकर उठून शेतातील पेरणीच्या कामात मदत करायला सांगितली. मात्र झोपेतून उठवल्यामुळे मयुरी संतापली आणि दोघींमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. त्यातून सासूवर हल्ला केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com