Beed News: बीडमध्ये चाललंय काय? आश्रम शाळेत अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्याचा छळ, नवऱ्याला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

Beed Ashram School: बीडमधील आश्रमशाळेच्या संस्थाचालकावर महिला कर्मचाऱ्याचा छळ, वेतन रोखणे आणि तिच्या पतीला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडिओनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Pune crime news
Pune crime newsSaam Tv News
Published On

बीड जिल्ह्यातील एका आश्रमशाळेच्या संस्थाचालकावर महिला कर्मचाऱ्याचा छळ केल्याचा आणि तिच्या पतीला शासकीय कार्यालयात मारहाण केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाची मोठी चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

ही घटना बीड जिल्ह्यातील अंतरवन पिंपरी तांडा इथल्या आश्रमशाळेशी संबंधित आहे. आश्रमशाळेत स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या सुरेखा चव्हाण यांनी संस्थाचालक दिनेश लाला पवार यांच्यावर अनेक गंभीर आरोप केलेत.

Pune crime news
Beed Crime: बीड हादरले! सासुरवाडीत जावयाची हत्या, धारदार शस्त्राने वार करत जागीच संपवलं

शाळेतील नियमित कामासोबतच स्वतःच्या घरातील धुणी-भांडी, फरशी पुसणं, झाडू मारणं अशी घरगुती कामं करण्यास भाग पाडलं जात असल्याचा त्यांचा दावा आहे. एवढंच नाही तर शेतात खुरपणी करणं आणि कापूस वेचणीसारखी शेतीची कामंही करावी लागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सुरेखा चव्हाण यांनी सांगितलं की, ही अतिरिक्त कामं करण्यास नकार दिल्यानंतर संस्थाचालकाने गेल्या सहा महिन्यांपासून त्यांचं वेतन रोखून ठेवलंय. त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्याचंही त्यांनी म्हटलंय. या संदर्भात त्यांनी संबंधित विभागाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला.

Pune crime news
Wardha Crime: महाराष्ट्र हादरला! १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या, शेतातील घरामध्ये विवस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह

तक्रार करण्यासाठी सुरेखा चव्हाण यांचे पती सतीश राठोड यांच्यासह समाजकल्याण विभागाच्या कार्यालयात गेले असता संस्थाचालक दिनेश लाला पवार यांनी अधिकाऱ्यांसमोरच शिवीगाळ करत सतीश राठोड यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून त्यामध्ये अश्लील भाषेत शिवीगाळ करत धमकी दिल्याचं दिसत असल्याचा दावा करण्यात येतोय.

Pune crime news
Beed : विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, उमेश मानेवर बलात्काराचा गुन्हा; विवाहित महिलेशी जबरदस्ती संबंध ठेवले अन्...

पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

या प्रकरणानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे आश्रमशाळांमधील कर्मचाऱ्यांच्या कथित शोषणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दरम्यान, या आरोपांबाबत संस्थाचालक दिनेश लाला पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com