Wardha Crime: महाराष्ट्र हादरला! १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या, शेतातील घरामध्ये विवस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह

Wardha Crime: वर्ध्यामध्ये भयंकर घटना घडली. १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.
Wardha Crime: महाराष्ट्र हादरला! १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या, शेतातील घरामध्ये विवस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह
Wardha Crime Saam tv
Published On
  • वर्ध्यामध्ये अल्पवयीन मुलीची हत्या

  • अत्याचार करून हत्या केल्याचा अंदाज

  • शेतातील घरात निर्वस्त्र अवस्थेत आढळला मृतदे

  • पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास केला सुरू

चेतन व्यास, वर्धा

वर्धा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. सावंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात १२ वर्षीय मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. शेतातील घरात या मुलीचा विवस्त्र अवस्थेतीली मृतदेह आढळून आला. या मुलीवर अत्याचार करून नंतर तिची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुलीच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून गावात तणावपूर्ण वातावरण आहे. या घटनेमुळे वर्धा जिल्हा हादरला.

मिळालेल्या माहितीनुसार, सावंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावाजवळील शेतातील घरात सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास मुलीचा मृतदेह आढळून आला. मृतदेह विवस्त्र अवस्थेत असल्याने अत्याचाराचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील तीन ते चार गावांतील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.

Wardha Crime: महाराष्ट्र हादरला! १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या, शेतातील घरामध्ये विवस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह
Crime : बलात्कारपीडित १३ वर्षीय मुलीला न्याय हवा होता, ज्याच्याकडे मदत मागितली त्या वकिलानेही केले अत्याचार

या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी महाडीक, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून आरोपींना तातडीने अटक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत गावात तणावाचे वातावरण होते. गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Wardha Crime: महाराष्ट्र हादरला! १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या, शेतातील घरामध्ये विवस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह
Crime: १३ वर्षीय भाचीचं अपरहण, शेतात नेऊन मामाकडून बलात्कार; नंतर गळा दाबून संपवलं

हत्या करण्यात आलेल्या मुलीचे कुटुंब शेतमजुरी करून उदरनिर्वाह करणारे आहे. मुलीच्या हत्येमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबीयांचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून अत्याचार झाला का? याबाबतचा अंतिम निष्कर्ष उत्तरीय तपासणी आणि न्यायवैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची अनेक पथके कामाला लागली आहेत.

Wardha Crime: महाराष्ट्र हादरला! १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या, शेतातील घरामध्ये विवस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह
Beed Crime: मुलीला का मारले? जाब विचारताच ५० वर्षीय महिलेच्या डोक्यात घातली वीट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com