

समृद्धी महामार्गावर नवऱ्याकडून बायकोची हत्या
प्रवासादरम्यान भांडण झालं त्यानंतर तरुणाने बायकोला संपवलं
आरोपी मृतदेहासह कारंजा पोलिस ठाण्यात गेला
पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली
वाशिमधून हत्याकांडाची भयंकर घटना समोर आली आहे. एका तरुणाने समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना बायकोची हत्या केली. चालत्या कारमध्ये डोक्यावर वार करत नंतर गळा दाबून त्याने बायकोची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाला सोबत घेऊन प्रवास करत त्याने थेट पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात गु्न्हा दाखल करत त्याला अटक केली. या घटनेमुळे वाशिम जिल्हा हादरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर वाशिमजवळ ही घटना घडली. तरुण बायकोसोबत कारने नागपूरवरून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होता. या प्रवासादरम्यान नवरा बायकोचे भांडण झाले. रागाच्या भरता आरोपीने बायकोची हत्या केली. त्यानंतर मृतदेह ड्रायव्हिंग सिटच्या बाजूला ठेवत त्याने अनेक किलोमीटरपर्यंत प्रवास केला. वाशिमच्या कारंजा येथील पोलिस ठाण्यात जाऊन आरोपीने बायकोच्या हत्येची कबुली दिली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
उत्तर प्रदेशच्या कलवर्धा येथील गौतमबुद्ध नगर भागात राहणाऱ्या हसीना बांनो (वय २८ वर्षे) असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव होते. सलमान खान नेक खान (३० वर्षे) असं आरोपीचे नाव आहे. उत्तर प्रदेशमधून ते मुंबईला कारने येत होते. आरोपी बायको आणि आपल्या ३ मुलांसोबत मुंबईला येत होता. वाटेमध्ये नवरा-बायकोमध्ये कडाक्याचे भांडण झाले. वाद इतका विकोपाला गेला की आरोपीने बायकोच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. त्यानंतर त्याने तिची गळा आवळून हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने मुलांसमोर बायकोची हत्या केली.
हत्या केल्यानंतर आरोपी सलमान खानने बायकोचा मृतदेह कारमध्ये बाजूला ठेवला. त्याने बायकोचा मृतदेह घेऊन थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्याने पोलिसांनी सर्वकाही सांगितले. पोलिसांनी तात्काळ त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या. आरोपीने बायकोची हत्या का केली यामागचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलिस आरोपीची चौकशी करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.