समृद्धी महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात, मुंबईला जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ५ जणांचा मृत्यू

Samruddhi Expressway accident : समृद्धी महामार्गावर अमरावतीजवळ भीषण कार-ट्रक अपघातात एका कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. चंद्रपूरहून मुंबईकडे जात असताना वॅगनआर कारने ट्रकला मागून धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला.
Samruddhi Expressway accident
Samruddhi Expressway accident
Published On

अमर गटारे, अमरावती प्रतिनिधी

Samruddhi Mahamarg Chandrapur Accident News : समृद्धी महामार्गावरून एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्याजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात वॅगनआर कारमधील एकाच कुटुंबातील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत नागरिक चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

ट्रकला मागून दिली धडक

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वॅगनआर कार (WagonR) चंद्रपूरवरून मुंबईच्या दिशेने जात होती. समृद्धी महामार्गावरील चॅनल नंबर १०५ च्या नजीक कारने पुढील ट्रकला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा चक्काचूर झाला असून कारमधील पाचही जणांचा जागेवरच मृत्यू झाला. या अपघातानंतर महामार्गवर वाहतूककोंडी झाली होती.

Samruddhi Expressway accident
cabinet reshuffle : मोदी मंत्रिमंडळात मोठा भूकंप! नितीन गडकरींचे खाते बदलणार? काय आहे मोदींचा मेगा प्लॅन, जाणून घ्या...

मृतांमध्ये एका चिमुरडीचा समावेश

या दुर्दैवी अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि समृद्धी महामार्गाच्या बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. मृतदेह गाडीबाहेर काढून रुग्णालयात पाठवण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

Samruddhi Expressway accident
निवृत्त DIG च्या घरावर ईडीचा छापा; तब्बल ५३ कोटींची संपत्ती जप्त

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com