cabinet reshuffle : मोदी मंत्रिमंडळात मोठा भूकंप! नितीन गडकरींचे खाते बदलणार? काय आहे मोदींचा मेगा प्लॅन, जाणून घ्या...

Narendra Modi Cabinet : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही नव्या चेहऱ्यांना संधी, तर काही विद्यमान मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Prime Minister Narendra Modi with Union Cabinet
Modi Cabinet Reshuffle Likely Soon
Published On

Modi cabinet reshuffle : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे. काही नव्या मंत्र्यांची मंत्रमंडळात एन्ट्री होण्याची शक्यता आहे. तर काही विद्यामान मंत्र्यांना डच्चू मिळू शकतो, असाही अंदाज वर्तवला जात आहे. त्याशिवाय काही नेत्यांचे कॅबिनेट खाते बदलू शकतो, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे. पुढील २ दिवसांत मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या फेरबदलावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे समजतेय. या विस्तारात नितीन गडकरी यांच्याकडे नवीन जबाबदारी देण्याची शक्यता वर्तवली जातेय.

धर्मेंद्र प्रधान यांचा पत्ता कट?

या संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे नाव सर्वात मोठे चर्चेत आहे. 'नीट' प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणानंतर देशभरात संतापाचे वातावरण होते. धर्मेंद्र प्रधान गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आहेत. livehindustan ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या या गदारोमुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते आणि त्यांच्याकडून शिक्षण मंत्रालय परत घेतले जाऊ शकते. याशिवाय सरकारच्या काही सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या मंत्रालयांच्या प्रभारींच्या खात्यांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या नावांचा समावेश आहे.

Prime Minister Narendra Modi with Union Cabinet
भयंकर! ७ वर्षांची मुलगी शेजारी झोपलेली असतानाच पत्नीचा गळा चिरून खून; नंतर पतीने मेट्रोसमोर उडी मारून संपवलं आयुष्य

पंजाबला प्राधान्य दिले जाते

यावेळी मंत्रिमंडळ विस्तारात पंजाबला विशेष महत्त्व मिळण्याची शक्यता आहे. विद्यमान पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या जागी दुसऱ्या एखाद्या शीख व्यक्तीला किंवा पंजाबमधील एका प्रमुख नेत्याला स्थान दिले जाऊ शकते. राघव चड्ढा यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून केंद्रीय मंत्रिमंडळात पंजाबला तुलनेने मर्यादित प्रतिनिधित्व मिळाले आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप यावेळी पंजाबचा वाटा वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

Prime Minister Narendra Modi with Union Cabinet
गुगलवर हत्येचे पर्याय शोधले, लोहगडवरून ढकलण्याचा सराव केला; केतन अग्रवाल खून प्रकरणाचा थरारक उलगडा

शक्तिकांत दास कॅबिनेट मंत्री ?

भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) माजी गव्हर्नर आणि सध्या पंतप्रधानांचे प्रधान सचिव असलेले शक्तिकांत दास यांना थेट मंत्रिमंडळात मंत्री म्हणून स्थान दिले जाऊ शकते, अशी जोरदार शक्यता वर्तवली जात आहे. निर्मला सीतारामन यांच्या जागी देशाचे नवे अर्थमंत्री म्हणून त्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते, अशीही चर्चा सुरू आहे. त्याशिवाय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो.

Prime Minister Narendra Modi with Union Cabinet
भयंकर! ७ वर्षांची मुलगी शेजारी झोपलेली असतानाच पत्नीचा गळा चिरून खून; नंतर पतीने मेट्रोसमोर उडी मारून संपवलं आयुष्य
Prime Minister Narendra Modi with Union Cabinet
एकनाथ शिंदेंच्या आमदाराने कंत्राटदाराकडून ४० लाखांची लाच घेतली? व्हिडीओने महाराष्ट्रात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com