एकनाथ शिंदेंच्या आमदाराने कंत्राटदाराकडून ४० लाखांची लाच घेतली? व्हिडीओने महाराष्ट्रात खळबळ

Rajesh Kshirsagar viral video : शिवसेना (ठाकरे गट) नेते रविकिरण इंगवले यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर ₹४० लाखांच्या कथित लाच मागणीचा गंभीर आरोप केला आहे. कथित व्हिडिओ समोर आल्यानंतर एसआयटी चौकशीची मागणी करण्यात आली.
Rajesh Kshirsagar bribery allegations
Rajesh Kshirsagar bribery allegations
Published On

Rajesh Kshirsagar bribery allegations : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर भ्रष्टाचार आणि लाचखोरीचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी हा गंभीर आरोप केला आहे. एका व्यावसायिकाकडून तब्बल ४० लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा दावा रविकिरण इंगवले यांनी केला. यासंदर्भातील पैशांच्या कथित देवाणघेवाणीच्या संभाषणाचा व्हिडिओ पत्रकार परिषदेत प्रसारित करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही इंगवले यांनी केली. दरम्यान, या आरोपांवर आमदार राजेश क्षीरसागर यांनी इंगवले हे ब्लॅकमेलर असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप करत, एका व्यावसायिकाकडून ४० लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा दावा केला. या व्यवहारासंदर्भातील कथित संभाषणाचा व्हिडिओ त्यांनी पत्रकारांसमोर सादर केला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Rajesh Kshirsagar bribery allegations
Worli Sea Link : मुंबईत खळबळ! ठाण्याच्या उद्योजकाची आत्महत्या, वरळी सी-लिंकवरून टाकली उडी

आमदार राजेश क्षीरसागर यांचा व्हिडिओ व्हायरल करण्यामध्ये काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा हात आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी हाच व्हिडिओ त्यांनी प्रसिद्ध केला होता. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती. मुळात रविकिरण इंगवले हा ब्लॅकमेलर आहे, असे पत्र आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी प्रसिद्ध केले आहे.

Rajesh Kshirsagar bribery allegations
जमीन मोजणीच्या नियमांत मोठा बदल! ग्रामीण आणि शहरी भागासाठी नवे शुल्क लागू; पाहा आता किती पैसे मोजावे लागणार?

कोल्हापूर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय पवार आणि विजय देवणे यांनी या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या व्हिडिओची SIT नेमून चौकशी करावी, त्याचबरोबर क्षीरसागर यांची आमदारकी रद्द करावी आणि त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये नाव आलेल्या राहुल आणि प्रशांत यांचा शोध घेऊन त्यांना देखील अटक करावी, असेही पत्रात म्हटले आहे.

Rajesh Kshirsagar bribery allegations
Maharashtra Rain : वादळी पावसाचा इशारा; विदर्भ आणि कोकणात 'येलो-ऑरेंज' अलर्ट, जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com