Crime News: बायकोच्या मोबाईलवर लोकेशन आलं अन् पायाखालची जमीनच सरकली; शेवटचा मेसेज करून वरिष्ठ इंजिनिअरने आंब्याच्या झाडाला...;

Maharashtra Crime News: नागपूरमधील वरिष्ठ इंजिनिअर राम विनोद चौधरी यांनी गुरुकुंज मोझरी येथे आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून आत्महत्येमागील कारणांचा शोध सुरू आहे.
Pune Crime
Pune Crime News Saam tv
Published On

नागपूरमधील एका खासगी कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या 39 वर्षीय इंजिनिअरने गुरुकुंज मोझरीमध्ये आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

मृताची ओळख राम विनोद चौधरी अशी आहे. ते नागपूरमध्ये कोराडी थर्मल पॉवर प्लांटमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी हे रविवारी सकाळी स्वतःच्या हुंडई कारने नागपूरहून अमरावतीच्या दिशेने आले. गुरुकुंज मोझरी बायपासलगत राष्ट्रसंत पेट्रोलियमजवळ कार उभी करून त्यांनी जवळील शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला.

Pune Crime
Pune Crime: पुणे हादरले! भररस्त्यात हत्याकांडाचा थरार, डोक्यात दगड घालून तरुणाला जागीच संपवलं

सकाळी सुमारे आठच्या सुमारास ही घटना निदर्शनास आल्यानंतर तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीये.

Pune Crime
Nagpur Crime: नागपूर हादरले! कौटुंबिक वाद टोकाला गेला, तिघांना पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

प्राथमिक माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी चौधरी यांनी पत्नीसह काही नातेवाईकांना गुरुकुंज मोझरी परिसरातील त्यांचं लोकेशन पाठवलं होतं. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यांचा मोबाईल जप्त केला असून त्यातील माहितीची तपासणी सुरू आहे. त्यांनी एवढ्या अंतरावर येऊन टोकाचं पाऊल का उचललंय, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Pune Crime
Pune Crime: पुणे हादरले! भररस्त्यात हत्याकांडाचा थरार, डोक्यात दगड घालून तरुणाला जागीच संपवलं

पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू असून कुटुंबीय, नातेवाईक तसंच संबंधित व्यक्तींची चौकशी केली जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच आत्महत्येमागील कारण स्पष्ट होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com