Ulhasnagar : उल्हासनगर पोलिसांची मोठी कारवाई! देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त ; आरोपीचं उत्तर प्रदेश कनेक्शन

Ulhasnagar Police News : उल्हासनगरमध्ये गुन्हे शाखा घटक-४ ने मोठी कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराला देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतूसासह अटक केली. या प्रकरणात उत्तर प्रदेश कनेक्शन समोर आल्याने पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला आहे.
ULHASNAGAR CRIME BRANCH ARRESTS ACCUSED WITH ILLEGAL COUNTRY-MADE PISTOL
ULHASNAGAR CRIME BRANCH ARRESTS ACCUSED WITH ILLEGAL COUNTRY-MADE PISTOLSaam tv
Published On
Summary
  • उल्हासनगर गुन्हे शाखा घटक-४ची मोठी कारवाई

  • आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले

  • प्राथमिक तपासात उत्तर प्रदेश कनेक्शन समोर आल्याने तपास तीव्र करण्यात आला आहे

  • पोलिसांनी पुढील तपासासाठी तीन स्वतंत्र पथके तयार केली आहेत

अजय दुधाणे, पुणे

उल्हासनगर शहरात पोलिसांची मोठी कारवाई. गुन्हे शाखा घटक-४ च्या पथकाने एका सराईत गुन्हेगाराला बेकायदेशीर अग्नीशस्त्रासह अटक केली आहे. रोहित सुनील मोरे उर्फ पानपाटील (वय २१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सी. ब्लॉक रोडवरील सेंच्युरी ग्राऊंड परिसरात एक तरुण संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेला मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखा घटक-४ च्या पथकाने तत्काळ घटनास्थळी सापळा रचला. पोलिसांनी संशयित तरुणाला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले.

ULHASNAGAR CRIME BRANCH ARRESTS ACCUSED WITH ILLEGAL COUNTRY-MADE PISTOL
Maharashtra Farmer Loan : कर्जमाफीचा मोठा निर्णय! ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार; सहकार विभागाची सरकारला माहिती

यानंतर पोलिसांनी आरोपी रोहित मोरे याला ताब्यात घेत भारतीय हत्यार कायदा कलम ३ आणि २५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) व १३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक चौकशीत आरोपीने हे पिस्टल उत्तर प्रदेशातील एका अज्ञात व्यक्तीकडून विकत घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला ‘उत्तर प्रदेश कनेक्शन’ लाभल्याची चर्चा सुरू झाली आहे.

ULHASNAGAR CRIME BRANCH ARRESTS ACCUSED WITH ILLEGAL COUNTRY-MADE PISTOL
Kitchen Hack : उन्हाळ्यात मडक्यातलं पाणी पिताय? थांबा! त्यापूर्वी 'हे' आधी करा

या घटनेनंतर पोलिसांनी अधिक तपासासाठी तीन स्वतंत्र पथके तयार केली असून आरोपीने हे शस्त्र कोणत्या उद्देशाने आणले होते, याचा शोध घेतला जात आहे. शहरात बेकायदेशीर हत्यारांची वाढती तस्करी आणि गुन्हेगारी प्रवृत्ती लक्षात घेता पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातून अशा प्रकारे बेकायदेशीर शस्त्रे शहरात पोहोचत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com