Alisha Khedekar
उन्हाळ्यात मातीच्या भांड्यातील पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. हे मातीचं भांडं कसं वापरायचं? त्याला धुण्याची योग्य पद्धत काय आहे? हे सविस्तर जाणून घ्या.
नवीन मातीचे भांडे वापरण्यापूर्वी १२-२४ तास मीठाच्या पाण्याने भरून ठेवा. यामुळे मातीचा वास कमी होतो आणि पाणी थंड राहते.
भांडे नेहमी थेट सूर्यप्रकाशापासून दूर आणि हवेशीर ठिकाणी ठेवा. त्यामुळे बाष्पीभवन चांगले होऊन पाणी नैसर्गिकरित्या थंड राहते.
भांड्यावर झाकण किंवा ओला कपडा ठेवल्याने धूळ आत जात नाही आणि पाण्याचा थंडपणा जास्त वेळ टिकून राहतो.
भांडे भरल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. २-३ तासांनी पाणी अधिक थंड होते आणि मातीचा नैसर्गिक सुगंध मिळतो.
मातीचे भांडे स्वच्छ करताना साबण किंवा कडक घासणी वापरू नका. त्यामुळे भांड्याची सूक्ष्म छिद्रे बंद होण्याची शक्यता असते.
मातीच्या भांड्यात खूप गरम पाणी टाकू नका. त्यामुळे भांड्याला तडे जाऊ शकतात किंवा ते गळण्याची शक्यता वाढते.
जास्त रंग किंवा केमिकल कोटिंग असलेली भांडी वापरणे टाळा. अशी भांडी पाणी योग्यरित्या थंड ठेवू शकत नाहीत.