प्राध्यापकासोबत नाव जोडले, मित्र-मैत्रिणींकडून अपमान सहन झाला नाही; आयुर्वेदाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं

Ayurveda Student Ends Life After Alleged Harassment: कर्नाटकातील होलाळकेरे येथे आयुर्वेद शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने मित्रांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Ayurveda student’s tragic death in Karnataka raises serious concerns over bullying and mental health in colleges.
Ayurveda student’s tragic death in Karnataka raises serious concerns over bullying and mental health in colleges.Saam Tv
Published On

कॉलेजमधील सोबत असलेल्या मित्र मैत्रिणींनी केलेला अपमान सहन न झाल्याने आयुर्वेद महाविद्यालयात शिकत असणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना कर्नाटक राज्यातील होलाळकेरे या शहरात घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने म्हटले की तिचे मित्र नाव एका प्राध्यापकाशी जोडत होते. या घटनेमुळे कॉलेजमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Ayurveda student’s tragic death in Karnataka raises serious concerns over bullying and mental health in colleges.
Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची SIT चौकशी

नेमके प्रकरण काय?

लिखिता ही मल्लाडीहळ्ळी येथील आयुर्वेद महाविद्यालयात BAMS चे शिक्षण घेत होती. कॉलेजमधील काही तिचे मित्र मैत्रिणीच तिला एका शिक्षकाच्या नावाने चिडवत असायचे. याबाबत तिने तिच्या आई वडिलांना देखील सांगितले होते. आई वडिलांनी तिला समजावून अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. मात्र ते सतत सरांच्या नावाने चिडवत असल्याने तिने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने एक चिठठी लिहिली आणि त्यामध्ये सर्व मुलांचे नाव लिहिले आहे. त्यामध्ये ती म्हणाली की माझा झालेला अपमान यामुळेच मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

Ayurveda student’s tragic death in Karnataka raises serious concerns over bullying and mental health in colleges.
Pune Crime: दुहेरी हत्याकांडाने आळंदी हादरली, वृद्ध महिलेसह ६ वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या

आई-वडिलांनी मुलीशी साधला होता संवाद

मृत विद्यार्थिनीचे आई-वडील दोघेही शिक्षक असून होलाळकेरे येथे राहतात. जेव्हा त्यांना कळले की त्यांच्या मुलीच्या मैत्रिणी तिच्याबद्दल अशा प्रकारे बोलत आहेत. तेव्हा त्यांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला आणि अशा गोष्टींची चिंता न करता महाविद्यालयातील अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. यानंतर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com