Mumbai Crime : वडिलांनी दारू सोडण्यासाठी सांगितलं, मुलाने थेट २१ व्या मजल्यावरून उडी मारली; मुंबईतील धक्कादायक घटना

Mumbai Wadala Crime News : मुंबईतील वडाळा येथे एका तरुणाने अपार्टमेंटच्या २१व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई पोलीस घटनेचा सखोल तपास करत आहेत.
Mumbai Crime : वडिलांनी दारू सोडण्यासाठी सांगितलं, मुलाने थेट २१ व्या मजल्यावरून उडी मारली; मुंबईतील धक्कादायक घटना
Mumbai Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • वडाळ्यात भरदिवसा तरुणाने २१व्या मजल्यावरून उडी मारली

  • घटनास्थळीच तरुणाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा

  • दारूच्या व्यसनामुळे घरात तणाव असल्याची माहिती

  • मुंबई पोलीस आत्महत्येच्या दिशेने तपास करत आहेत

मुंबईतील वडाळामधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. वडाळा येथील एका तरुणाने तो राहत असलेल्या अपार्टमेंटच्या २१ व्या मजल्यावरून उडी मारली. धक्कादायक म्हणजे वडिलांनी दारूचे व्यसन सोडण्यासाठी सल्ला दिल्याने तरुणाने हे पाऊल उचलले असल्याचं म्हटलं जात आहे. या दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. प्राथमिक अंदाजानुसार ही आत्महत्या असल्याचे म्हटले जात आहे. सदर घटना रविवारी भरदिवसा घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली असून मुंबई पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृताचे नाव हैदर कराचीवाला असे आहे. हैदरला दारूचे व्यसन होते, ज्यामुळे घरी अनेकदा वाद होत होते आणि तणाव वाढला होता. शनिवारी सकाळी हैदरचा त्याच्या कुटुंबियांशी वाद झाला. त्यानंतर तो रागाच्या भरात घराबाहेर पडला. त्यानंतर काही वेळातच त्याचे वडील युसूफ कराचीवाला यांना पहाटे ४ वाजताच्या सुमारास विलेपार्ले पोलिस ठाण्यातून फोन आला.

Mumbai Crime : वडिलांनी दारू सोडण्यासाठी सांगितलं, मुलाने थेट २१ व्या मजल्यावरून उडी मारली; मुंबईतील धक्कादायक घटना
Avinash Jadhav : "₹३०० चा हप्ता घेतात अन्..." व्यवसाय करणाऱ्या मराठमोळ्या तरूणीला डोंबिवलीत त्रास, राज ठाकरेंचा आदेश येताच....

पोलिसांनी सांगितले की त्यांचा मुलगा दारूच्या नशेत सापडला आहे आणि त्याला घरी घेऊन जावे. वडील रविवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास त्याला घरी घेऊन आले. घरी परतल्यानंतर, हैदरच्या पालकांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याला दारू सोडण्याचा सल्ला दिला.

Mumbai Crime : वडिलांनी दारू सोडण्यासाठी सांगितलं, मुलाने थेट २१ व्या मजल्यावरून उडी मारली; मुंबईतील धक्कादायक घटना
Accident News : पुण्यात हिट अँड रनचा थरार! मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेला भरधाव कारने उडवलं

या वादविवादानंतर हैदर त्याच्या खोलीत गेला. बराच वेळ हैदर खोलीबाहेर न पडल्याने त्याच्या वडिलांनी त्याला हाक मारली. मात्र हैदरने काहीच उत्तर दिले नाही. त्यामुळे हैदरच्या वडिलांना शंका आली. त्यामुळे ते हैदरच्या खोलीत गेले. दरम्यान सकाळी ८:१५ च्या सुमारास, हैदरच्या वडिलांना तो त्याच्या खोलीतून पडल्याचे आढळले.

Mumbai Crime : वडिलांनी दारू सोडण्यासाठी सांगितलं, मुलाने थेट २१ व्या मजल्यावरून उडी मारली; मुंबईतील धक्कादायक घटना
WEH-BKC Bridge Update : वेस्टर्न एक्सप्रेस हायवे ते बीकेसी प्रवास होणार सुसाट, नवा पूल लवकरच होणार सुरू; कोणाला होणार जास्त फायदा? वाचा

यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांना घडलेल्या घटनेबाबत पाचारण केले असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार हे आत्महत्येचं प्रकरण असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र ठोस कारण अद्यापही समोर आलेलं नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून हैदरच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com