Success Story: ४ गुंठे जमिनीतून ५ लाखांचे उत्पन्न; पुदिन्याच्या शेतीतून शेतकरी मालामाल; बीडच्या शेतकऱ्याचा प्रवास वाचाच

Success Story of Beed Farmer do Pudina Farming: बीडच्या शेतकऱ्याने फक्त ४ गुंठे जमिनीतून लाखो रुपये कमवले आहे. बालासाहेब चोपणे यांनी पुदिन्याच्या शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे.
Success Story
Success StorySaam tv
Published On
Summary

बीडच्या शेतकऱ्याचा अनोखा शेती प्रयोग

४ गुंठे जमिनीतून मिळवलं ५ लाखांचं उत्पन्न

पुदिना शेतीचा प्रयोग ठरला यशस्वी

शेती करणे सध्याच्या महागाईच्या जगात परवडणारे नाही, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. त्यात अवकाळी पाऊल, पूरसदृष्य परिस्थिती यामुळे शेतीतून फार काही उत्पन्न मिळत नाही. उलट शेतकरीच कर्जबाजारी होतो. दरम्यान, अशा परिस्थितीवरही शेतकरी मात करताना दिसत आहे. बीडच्या आंबेजोगाईत एका शेतकऱ्याने पुदीन्याच्या शेतीतून लाखो रुपये कमावले आहे. त्यांचा हा निर्धार इतर शेतकऱ्यांसाठी खूपच प्रेरणादायी आहे.

Success Story
Success Story: वडिलांचे अर्धवट स्वप्न पूर्ण करण्यासाठी लेकाने दिली UPSC; २१व्या वर्षी IPS; आदर्श कांत शुक्ला यांचा प्रेरणादायी प्रवास

बीडच्या शेतकऱ्याची अनोखी कामगिरी

बीडच्या आंबेजोगाईलगत्या एका अल्पभूधारक शेतकऱ्याने नवीन आदर्श निर्माण केला आहे. बालासाहेब चोपणे या शेतकऱ्याने आपल्या अवघ्या 04 गुंठे जमिनीत पुदिन्याची शेती केली आहे. या शेतीतून त्यांना ५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे.

बालासाहेब चोपणे यांनी मागच्या ५ वर्षात ५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवले आहे. बालासाहेब चोपणे यांच्याकडे २० गुंठे जमीन आहे. यामध्ये त्यांनी पेरु, आंबा आणि इतर फुलांची झाडे लावली आहे. त्यांनी कोविडच्या काळात पुदिन्याची लागवड केली. हा अनोखा प्रयोग यशस्वी झाला. ते या शेतीसाठी कोणत्याही रासायनिक खतांचा किंवा औषधांचा वापर करत आहे. पूर्णपणे सेंद्रीय पद्धतीने ही शेती केली जाते.

Success Story
Success Story: लहानपणीचं स्वप्न पूर्ण, दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IPS केशव कुमार चौधरी यांचा प्रेरणादायी प्रवास

पुदिना पिकाला रोज पाण्याची गरज असते. बालासाहेब यांनी बोअरवेलच्या पाण्यातून पिकाला पाणीपुरवठा केला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी स्वतः आठवडी बाजारात जाऊन हा पुदीना विकला आहे. त्यांना महिन्यातून किमान ५ हजारांचे उत्पन्न मिळते. गेल्या पाच वर्षात त्यांनी ५ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. शेतकऱ्याच्या या अनोख्या प्रयोगामुळे इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे.

Success Story
Ranveer Singh : 'धुरंधर 2'ची Success पार्टी रणवीर सिंगने गाजवली; fa9la गाण्यावर बेभान होऊन नाचला, VIDEO होताय तुफान व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com