

बीड जिल्ह्यात विवाहित महिलेवर अत्याचार
अत्याचारानंतर महिलेला गावाच्या चावडीला बांधलं
या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा
योगेश काशिद, साम टीव्ही
बीडमध्ये पुन्हा एकदा संतापजनक घटना घडली आहे. कृष्णा आंधळे आणि जयराम चाटे यांच्या टोळीने एकाला मारहाण केल्याची घटना ताजी असताना विवाहित महिलेवर अत्याचाराची घटना घडली. महिलेवर अत्याचारानंतर गावच्या चावडीत बांधून ठेवलं आहे. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. तर आरोपीला 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून गावाबाहेर नेलं. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. यानंतर तिला गावामध्ये आणून गावच्या चावडीवर खांबाला बांधून ठेवले गेले. हा प्रकार सकाळी समोर आल्यानंतर गावकऱ्यांनी या विवाहितेची सुटका केली. या प्रकरणात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी वैभव पटेकर याला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात पिंपळनेर पोलिसांसह पिंक पथकाकडून तपास केला जातोय. परंतु या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ऊसाच्या शेतात आढळला वृद्धाचा जळालेला मृतदेह
बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर शिवार आज शनिवारी पहाटे हादरले. ऊसाच्या फडात लागलेल्या आगीमध्ये एका 60 वर्षीय वयोवृद्धचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. विश्वनाथ पांचाळ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पहाटे साडेपाचच्या सुमारास ऊसाच्या शेताला आग लागल्याची माहिती मिळाली.
आग विझविण्याचे प्रयत्न सुरू असताना सरीमध्ये हा जळालेला मृतदेह आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार, आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. विश्वनाथ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.