Success Story: वडिलांचे अर्धवट स्वप्न पूर्ण करण्यासाठी लेकाने दिली UPSC; २१व्या वर्षी IPS; आदर्श कांत शुक्ला यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story of IPS Adarsh Kant Shukla: आदर्श कांत शुक्ला यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली आहे. ते २१व्या वर्षी आयपीएस अधिकारी झाले आहेत.
Success Story
Success StorySaam Tv
Published On
Summary

IPS आदर्श कांत शुक्ला यांचा प्रेरणादायी प्रवास

वडिलांचे अर्धवट स्वप्न केले पूर्ण

दिवसरात्र मेहन करुन २१व्या वर्षी झाले IPS

आयएएस किंवा आयपीएस होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. सिविल सर्व्हिसमध्ये काम करण्यासाठी राज्य सेवा आयोग किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास करावी लागते. यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. या परीक्षेसाठी दिवसरात्र एक करुन अभ्यास करावा लागतो. असंच काहीसं आदर्श कांत शुक्ला यांनी केलं. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली आहे. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

Success Story
Success Story: वडिलांचे अपूर्ण स्वप्न लेकीने केलं पूर्ण! सांगलीच्या आरुषा पाटील होणार सरकारी अधिकारी; वाचा सक्सेस स्टोरी

खूप मेहनत, शिस्त आणि कुटुंबाच्या सपोर्टमुळे आदर्श कांत शुक्ला यांनी यूपीएससी परीक्षा पास केली. आदर्श हे मूळचे उत्तर प्रदेशमधील बारांबकी येथील रहिवासी आहे. त्यांनी रोज खूप अभ्यास केला. त्यांनी आपल्या स्वप्नांना फॉलो करत यूपीएससी परीक्षा दिली. त्यांनी यूपीएससी परीक्षेत १४९ रँक प्राप्त केली. त्यांनी २१व्या वर्षी यूपीएससी परीक्षा पास केली. ते देशातील सर्वात लहान आयपीएस अधिकारी आहेत.

Success Story
Success Story: १० वर्ष ९ ते ५ नोकरी; सकाळी ४ वाजता उठून अभ्यास; पाचव्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IPS नविता कुमारी यांचा प्रवास

आदर्श कांत शुक्ला यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी२०२० मध्ये परीक्षा दिली होती. त्यांचे वडील प्रायव्हेट कंपनीत काम करत होते. त्यांची आर्थिक परिस्थिती फार काही चांगली नव्हती. त्यांच्या वडिलांचे सिविल सर्व्हिसमध्ये जाण्याचे स्वप्न होते परंतु काही कारणांनी त्यांना हे करता आले नाही. यामुळे त्यांच्या मुलाने त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.

आदर्श हे लहानपणापासूनच खूप हुशार होते. त्यांच्या आईवडिलांनी त्यांना खूप चांगले शिक्षण दिले. त्यांनी लखनऊमधील नॅशनल पीजी कॉलेजमधून बी.एससी पदवी प्राप्त केली. आदर्श यांनी कॉलेजच्या दिवसात संपूर्ण लक्ष अभ्यासावर दिले होते. त्यानंतर त्यांनी कॉलेज सोडल्यावर यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

यूपीएससी परीक्षेची तयारी करताना आदर्श यांनी मूव्ही, वेब सीरीज, डॉक्युमेंट्री किंवा क्रिकेट बघणे सोडले नाही. त्यांनी या सर्व गोष्टी करुन यूपीएससी परीक्षा दिली. त्यांनी रोज ७-८ तास अभ्यास केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली.

Success Story
Success Story: वडील मजूरी करायचे, लेकाने क्रॅक केली UPSC; पुलवाम्यातील पहिले IAS तौसीफ अहमद गनी यांचा प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com