Post Office MIS: घरबसल्या मासिक उत्पन्न हवंय? 'हा' आहे सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय; दरमहा ₹9,250 हमखास व्याज

Sakshi Sunil Jadhav

पोस्ट ऑफिस योजना

पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या सुरक्षित आणि हमखास परतावा देणाऱ्या बचत योजना राबवते. यामध्ये पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम (MIS) योजनेची माहिती जाणून घेऊयात.

Monthly Income Scheme

मंथली इनकम स्कीम

पोस्ट ऑफिसची एमआयएस ही अशी बचत योजना आहे, ज्यामध्ये एकदाच गुंतवणूक करून 5 वर्षांपर्यंत दरमहा निश्चित व्याज मिळते.

Monthly Income Scheme | google

सध्याचा व्याजदर किती आहे?

पोस्ट ऑफिस एमआयएस योजनेवर सध्या 7.4 टक्के वार्षिक व्याजदर दिला जात आहे.

Post Office Investment

दरमहा उत्पन्न

जर नवरा-बायको मिळून जॉइंट खातं उघडलं, तर दरमहा ₹9,250 पर्यंत फिक्स व्याज मिळू शकते.

Safe Investment India

गुंतवणुकीची किमान आणि कमाल मर्यादा

या योजनेत किमान ₹1,000 पासून गुंतवणूक करता येते. सिंगल खाते असेल तर कमाल ₹9 लाख जॉइंट खाते असेल तर कमाल ₹15 लाख रुपयांची मर्यादा मिळते.

Safe Investment India

संयुक्त खातं

एमआयएस योजनेत जास्तीत जास्त 3 व्यक्तींच्या नावावर संयुक्त खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे.

Safe Investment India

₹15 लाख गुंतवणुकीवर किती व्याज

जर पती-पत्नीने मिळून ₹15 लाख गुंतवले, तर दरमहा ₹9,250 इतकं निश्चित उत्पन्न फक्त व्याजातूनच मिळेल.

Monthly Income Scheme

व्याजाची रक्कम कशी मिळते?

एमआयएस योजनेअंतर्गत मिळणारे मासिक व्याज थेट बँक खात्यात जमा केले जाते.

Monthly Income Scheme

योजनेची मुदत किती?

पोस्ट ऑफिसची एमआयएस योजना 5 वर्षांनंतर मॅच्युअर होते. मुदत पूर्ण झाल्यावर मूळ गुंतवणूक रक्कम परत मिळते.

Monthly Income | ai

NEXT: Kokani Recipes: बाहेरुन कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट; कोकणी स्टाईल नारळाचे वडे बनवण्याची पारंपारिक रेसिपी वाचा

coconut vade recipe
येथे क्लिक करा