Ranveer Singh : 'धुरंधर 2'ची Success पार्टी रणवीर सिंगने गाजवली; fa9la गाण्यावर बेभान होऊन नाचला, VIDEO होताय तुफान व्हायरल

Ranveer Singh Dance Video : रणवीर सिंगने 'धुरंधर 2'ची सक्सेस पार्टीत आपल्या डान्सने चारचाँद लावले आहेत. रणवीर सिंग fa9la गाण्यावर बेभान होऊन नाचला आहे.
Ranveer Singh Dance Video
Ranveer Singh saam tv
Published On
Summary

'धुरंधर 2'ची सक्सेस पार्टी नुकतीच पार पडली.

'धुरंधर 2'च्या सक्सेस पार्टीत रणवीर सिंगने fa9la गाण्यावर भन्नाट डान्स केला.

'धुरंधर 2' चित्रपट 19 मार्च 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

'धुरंधर 2' मोठा इतिहास रचला आहे. रिलीजच्या दोन दिवसांत रणवीर सिंगच्या 'धुरंधर 2' ने 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. 'धुरंधर' 5 डिसेंबर 2025 रिलीज झाला होता. तर 19 मार्च 2026 ला 'धुरंधर: द रिव्हेंज' रिलीज झाला. सर्वत्र रणवीर सिंग आणि आदित्य धरचे कौतुक होताना दिसत आहे. 'धुरंधर 2' हा एक जबरदस्त ॲक्शन चित्रपट असून यात रहमान डकैतच्या मृत्यूनंतर पुढे काय घडते, हे दाखवण्यात आले आहे. 'धुरंधर 2' ला जगभरातून प्रेम मिळत आहे.

'धुरंधर' चित्रपटातील Fa9la गाणे आजही सोशल मीडियावर तुफान गाजते. अक्षय खन्नाच्या डान्स स्टेप्सचे चाहते तर दिवाने आहेत. या गाण्याने थिएटरमध्ये धुमाकूळ घातला. सर्वसामान्य पासून ते कलाकारांपर्यंत सर्वांनीच अक्षय खन्नाच्या या Fa9la गाण्यावर भन्नाट रील केल्या. अक्षय खन्नाच्या डान्स स्टेप्सने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. आता या अक्षय खन्नाच्या गाण्यावर रणवीर सिंगने ठेका धरला आहे. रणवीरने Fa9la गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.

'धुरंधर 2' नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'धुरंधर 2'ची सक्सेस पार्टी थाटामाटात पार पडली. मुंबईत कलाकारांसाठी आणि क्रू मेंबर्ससाठी एक खास चित्रपटाचे स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. 'धुरंधर 2'च्या पार्टीला दिग्दर्शक आदित्य धर, रणवीर सिंग, यामी गौतम, संजय दत्त, अर्जुन रामपाल, सौम्या टंडन, आयशा खान असे अनेक कलाकार आले होते. या पार्टीतील फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. असा एक रणवीर सिंगचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात तो Fa9la गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये रणवीर सिंग Fa9la गाण्यावर अक्षय खन्नाच्या स्टाइमध्ये डान्स करताना दिसत आहे. रणवीरने अक्षय खन्नाच्या स्टेप्स अगदी सेम टू सेम रिक्रिएट केल्या आहेत. व्हिडीओमध्ये रणवीर सिंग 'धुरंधर'चे कस्टमाइज्ड टी-शर्ट आणि जॅकेटमध्ये दिसत आहे. या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्सचा वर्षाव करत आहे. त्याच्या डान्सच्या स्टाइलचे कौतुक करत आहेत.

Ranveer Singh Dance Video
Famous Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, सिनेसृष्टी शोक सागरात बुडाली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com