Ranveer Singh Death Threats: रणवीर सिंग आणि रोहित शेट्टीला पुन्हा धमकी; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या गुंडाचे नाव समोर

Ranveer Singh Death Threats: रणवीर सिंग आणि रोहित शेट्टी यांना पुन्हा एकदा धमकी मिळाली आहेत. लॉरेन्स बिश्नोई टोळीने त्यांना धमक्या दिल्या आहेत. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
Ranveer Singh and Rohit Shetty receive threat again
Ranveer Singh and Rohit Shetty receive threat again Saam Tv
Published On

Ranveer Singh Death Threats: 'धुरंधर' स्टार रणवीर सिंग आणि 'सिंघम' चे दिग्दर्शक रोहित शेट्टी यांना पुन्हा धमक्या मिळाल्या आहेत. रोहित शेट्टीच्या घरी झालेल्या फायरिंगनंतर रणवीर सिंगला १० फेब्रुवारी रोजी पहिली धमकी मिळाली होती. आता, दोघांनाही पुन्हा धमक्या मिळाल्या आहेत. लॉरेन्स बिश्नोई टोळीने संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोई टोळीतील गँगस्टर हॅरी बॉक्सरने यावेळी बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अभिनेता रणवीर सिंग यांना धमकी दिली आहे.

धमकीत काय म्हटले आहे

रणवीर सिंग आणि रोहित शेट्टी दोघांनाही पोलिस तक्रार करण्यासाठी धमक्या मिळाल्या आहेत. धमकीत म्हटले आहे की, "रणवीर सिंग, तू रोहित शेट्टीला पोलिसात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला होतास ना? आता आम्ही तुला सांगू की तुझ्या सात पिढ्या आम्हाला काही इजा करू शकणार नाहीत. आम्हाला तुमच्या दोघांचे सर्व मॅनेजर कोण आहेत हे माहित आहेत. ते कुठे राहतात, ते कधी येतात आणि जातात, त्यांचे कुटुंब कुठे राहत. आम्ही प्रत्येक मॅनेजरला एक-एक करून ठिकाने लावू? की त्याआधी तू सुधारशील."

Ranveer Singh and Rohit Shetty receive threat again
Ghooskhor Pandat Controversy: 'घूसखोर पंडित' नावात होणार बदल? मनोज वाजपेयीच्या चित्रपटावर सुप्रीम कोर्टात काय निर्णय झाला?

पोलिसांचे काय म्हणणे आहे?

याशिवाय, भारतीय पासपोर्ट जप्त केल्यानंतर पोर्तुगालमध्ये झालेल्या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीतील गँगस्टर हॅरी बॉक्सरने स्वीकारली आहे. बिश्नोई टोळी आणि हॅरी बॉक्सर यांनी दिलेल्या कथित ऑडिओ मॅसेज धमकीबाबत मुंबई पोलिस त्यांच्या विधानावर ठाम आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की या ऑडिओ मॅसेजचा प्राथमिक स्रोत सोशल मीडिया आहे. हा ऑडिओ मॅसेज त्यांच्यापर्यंत सोशल माध्यमांद्वारे पोहोचला आहे. टोळीशी संबंधित असलेल्या एखाद्या व्यक्तीचा आहे की नाही हे तपासातच स्पष्ट होईल.

Ranveer Singh and Rohit Shetty receive threat again
Don 3: 'जर शाहरुख खान आला तर...'; 'डॉन ३' वादात ४० कोटी वाचवण्यासाठी रणवीर सिंगचा मोठा काउंटर

पोलिस ऑडिओची चौकशी करतील

मुंबई पोलिसांनी या टोळ्यांबाबत आधीच स्पष्ट केले आहे की कॉपीकॅट गुन्हेगार आणि खरा धोका यांच्यात फरक करणे अत्यंत कठीण आहे. पोलिसांच्या मते, असे अनेक बनावट ऑडिओ मॅसेज एआय वापरून सहजपणे तयार केले जातात.पोलिस या व्हायरल ऑडिओ मॅसेजचा सखोल तपास आणि चौकशी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com