Badlapur New Railway: बदलापूरवरुन नवी मुंबई गाठा फक्त ३० मिनिटांत; नवा रेल्वे मार्ग लवकरच येणार सेवेत; काय आहे सरकारचा मेगाप्लान?

Badlapur- Navi Mumbai Railway New Route: बदलापूरवरुन आता थेट नवी मुंबईला जाता येणार आहे. यासाठी नवीन रेल्वे मार्ग तयार केला जाणार आहे. यामुळे प्रवाशांचा खूप वेळ वाचणार आहे.
Badlapur New Railway
Badlapur New RailwaySaam Tv
Published On
Summary

बदलापूर ते नवी मुंबई नवीन रेल्वे मार्ग

बदलापूर ते नवी मुंबई फक्त अर्ध्या तासात गाठता येणार

बदलापूर, अंबरनाथ, वांगणीतील प्रवाशांना होणार फायदा

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता बदलापुर- अंबरनाथकरांचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे. यासाठी नवीन रेल्वेमार्ग तयार केला जात आहे. कासगाव-कामोठे या नवीन रेल्वे मार्गाला हिरवा कंदील मिळाला आहे. या रेल्वे मार्गाच्या लोकेशन सर्व्हेला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी नुकतीच नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीत नव्या रेल्वे मार्गाच्या सर्व्हेक्षणाला मंजुरी देण्यात आली आहे.

Badlapur New Railway
Central Railway : मध्य रेल्वेच्या RPF आणि GPF पथकाची मोठी कारवाई! १२.८२ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त; असा सापडला आरोपी जाळ्यात

रेल्वेचा नवीन मार्ग (Railway New Line)

रेल्वेच्या या नवीन मार्गामुळे मुंबईकरांचा प्रवास खूप सोपा होणार आहे. बदलापूरवरुन थेट नवी मुंबईला जाता येणार आहे. बदलापूर ते नवी मुंबई हा प्रवास ३० मिनिटांत होणार आहे. याचसोबत आजूबाजूच्या परिसरात कनेटिव्हिटी वाढेल. त्यामुळे खूप फायदा होणार आहे. बदलापुर वांगणी आणि आजूबाजूच्या इतर ठिकाणांना फायदा होणार आहे.

बदलापूर आणि अंबरनाथमध्ये जवळपास १० लाख लोक राहतात. शहरातील अनेक लोक कामासाठी नवी मुंबईला जातात. शहरातील लोकांना नवी मुंबईला जाण्यासाठी ठाण्यावरुन ट्रेन बदलून जावे लागते. यामुळे दीड तास लागतात. मात्र, बदलापूरवरुन थेट नवी मुंबईला जोडल्या जाणाऱ्या या ट्रेनमुळे प्रवास सोपा आणि जलद होणार आहे.

Badlapur New Railway
Vande Bharat Express : हा कसला माज ! मुंबईहून शिर्डीला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक, VIDEO

वांगणी आणि बदलापूरच्या मध्ये कासगाव हे स्थानक उभारण्यात येणार आहे. त्यानंतर कासगाव ते कामोठे हा नवीन रेल्वे मार्ग तयार केला जाणार आहे. यामुळे नवी मुंबईला फक्त अर्ध्या तासात जाता येणार आहे. हा रेल्वे मार्ग झाल्यास बदलापूर, अंबरनाथ, वांगणी, उल्हासनगर येथील प्रवाशांना खूप फायदा होणार आहे. अवघ्या काही मिनिटात ते नवी मुंबईला पोहचू शकतात.

Badlapur New Railway
Railway Recruitment: रेल्वेत नोकरीची संधी; ११ हजारांपेक्षा जास्त पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com