Ambernath MIDC Fire: अंबरनाथ MIDC मध्ये भीषण आग; ३ ते ४ कंपन्या आगीच्या विळख्यात, आकाशात पसरले धुरांचे लोट

MIDC Chemical Factory Fire: अंबरनाथमधील आनंद नगर एमआयडीसीमधील एका केमिकल कंपनीत भीषण आग लागली आहे. आकाशात दाट धुराचे लोट पसरले आहेत.
MIDC Chemical Factory Fire:
MIDC Chemical Factory Fire:
Published On
Summary
  • अंबरनाथच्या आनंद नगर MIDC मधील केमिकल कंपनीला भीषण आग लागली.

  • आगीदरम्यान स्फोट होत असल्याची माहिती समोर आली.

  • आकाशात मोठ्या प्रमाणात धुरांचे लोट पसरले.

अंबरनाथमधील आनंद नगर MIDC मध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आनंद नगर MIDC मधील केमिकल कंपनीला आग लागली असून मध्ये मध्ये स्फोट होत आहेत. आगीने रौद्र रुप घेतलं अशून आकाशात धुरांचे लोट पसरले आहेत. आगीच्या ज्वालाही धुरात दिसत आहे. धुरांमुळे आकाशात पूर्णपणे काळोख दाटलाय. दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कार्य चालू आहे. हाती आलेल्या माहितीनुसार एकापाठोपाठ तीन ते ४ कंपनीला आग लागली आहे.

MIDC Chemical Factory Fire:
Badlapur: बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणात मोठी अपडेट, सोनोग्राफी सेंटर पोलिसांकडून सील

हे दृश्य इराण किंवा इस्रायलमधील युद्धाचे नाहीत, तर हे दृश्य आहेत, अंबरनाथमधील एमआयडीसीमध्ये लागलेल्या आगीचे. आकाशात पसरलेले धुरांचे लोट पाहून अनेकांना धडकी भरली असेल. एखादा बॉम्ब हल्ला होऊन मोठा स्फोट घडावा असा भडका आगीने घेतलाय. आगीचे भयान दृश्य पाहून अनेकांचा थरकाप उडलाय.

अंबरनाथमधील आनंदनगर एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीला आग लागली. आग लागल्यानं मध्ये-मध्ये स्फोट होत आहेत. स्फोटामुळे आग भडकली असून आगीच्या ज्वाला दूरपर्यंत दिसत आहेत.

श्री गणेश नावाच्या केमिकल्स कंपनीत अचानक आग लागल्यानंतर काही मिनिटात या आगीने रौद्ररूप धारण केले. या कंपनीत रासायनिक साठा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अनेक स्फोट झाले. या स्फोटांचा हादरा दोन किलोमीटर अंतरापर्यंत कंपन्यांना जाणवला. एवढेच नव्हे तर कंपनीच्या परिसरात असलेल्या इतर कंपन्यांमध्ये देखील आगीच्या विळख्यात आल्या.

MIDC Chemical Factory Fire:
Kanjurmarg Badlapur Metro: कांजुरमार्ग-बदलापूर मेट्रोचं काम या वर्षीच होणार सुरु; विक्रोळी, अंबरनाथ... कोणती स्थानके असणार?

कंपनीतील ड्रमचे स्फोट झाल्यानंतर संपूर्ण रासायन एमआयडीसीच्या रस्त्यावर पसरले होते. त्या ठिकाणी देखील रस्त्यावर आग लागली होती. आगीचा रौद्ररूप पाहून एमआयडीसी अग्निशमन केंद्राने जिल्ह्यातील सर्वच महापालिका आणि औद्योगिक क्षेत्रांना ही आग आटोक्यात आणण्यासाठी मदत मागितली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com