Railway Recruitment: रेल्वेत नोकरीची संधी; ११ हजारांपेक्षा जास्त पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Railway ALP Recruitment 2026: रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ११ हजारपेक्षा जास्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. त्यामुळे सरकारी नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे.
Railway
Railway SaamTv
Published On
Summary

रेल्वेत नोकरीची संधी

असिस्टंट लोको पायलट पदांसाठी भरती

तब्बल १११२७ पदांसाठी भरती

रेल्वेत सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेने आपली नवीन भरती जाहीर केली आहे. असिस्टंट लोको पायलट पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. रेल्वेतील या नोकरीसाठी शॉर्ट नोटिफिकेशन जारी केले आहे. एकूण १११२७ जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे चांगली सरकारी नोकरी करण्याची संधी आहे.

Railway
Indian Bank Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार बँकेत नोकरी, पगार ८५,९२० रुपये; पात्रता काय?वाचा

रेल्वेतील असिस्टंट लोको पायलट पदासाठी अर्जप्रक्रिया १५ मेपासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जून २०२६ आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. या नोकरीसाठी rrbapply.gov.in वर जाऊन अर्ज करावे.

असिस्टंट लोको पायलट पदासाठी पात्रता (Railway Assistant Loco Pilot Eligibility)

रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १०वी पास असणे गरजेचे आहे. आयटीआय पास झालेले असावे. याचसोबत इंजिनियरिंगचा डिप्लोमा केलेला असावा. ज्यांनी इंजिनियरिंग केले आहे त्यांनीच अर्ज करावेत. या नोकरीसाठी १८ ते ३० वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

Railway
Government Job: १० वी शिक्षण झालेल्यांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा कराल अन् शेवटची तारीख काय? जाणून घ्या

असिस्टंट लोको पायलट पदासाठी उमेदवारांची निवड सीबीटी टेस्ट १, सीबीटी टेस्ट २ आणि कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि कागदपत्र पडताळणीद्वारे केली जाणार आहे. यानंतर मेडिकल टेस्ट होणार आहे.या नोकरीसाठी निवड झाल्यावर सुरुवातीला १९,९०० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत इतर भत्तेदेखील दिले जाणार आहेत.

रेल्वेतील या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. काही दिवसात तुमच्यासाठी अर्जप्रक्रिया सुरु होईल. त्यानंतर इच्छुकांनी अर्ज करावेत.

Railway
Desk Job Risks: 8 तास डेस्क जॉब केल्याने तरुणांमध्ये वाढतोय 'हा' आजार, आताच करा हे बदल, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com