Ration Card: रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! हे काम लगेच करा, अन्यथा बंद होईल लाभ

Ration Card eKYC Mandatory: रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेशनधारकांना आता केवायसी करणे अनिवार्य केले आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुमचा लाभ बंद होणार आहे.
Ration Card
Ration CardSaam Tv
Published On
Summary

रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी

ईकेवायसी करणे अनिवार्य

अन्यथा मिळणार नाही मोफत रेशन

देशातील कोट्यवधी लाभार्थी रेशनचा लाभ घेतात. देशातील कोट्यवधी कुटुंबाकडे रेशन कार्ड आहे. रेशन घेणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सरकारने रेशन वितरण प्रणालीला पूर्णपणे पारदर्शक करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने ईकेवायसी करण्यास सांगितले आहे. जर ईकेवायसी केली नाही तर तुम्हाला रेशनचा लाभ घेता येणार नाहीये.

Ration Card
Ration Card Update: रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी! तांदळाऐवजी पुढील 3 महिने मिळणार मका, नेमकं सत्य काय?

३० एप्रिलपर्यंत हे काम कराच

रेशन कार्डवर दर महिन्याला मोफत अन्नधान्य मिळते. हा लाभ जर तुम्हाला असाच सुरु ठेवायचा असेल तर केवायसीचे काम सर्वात पूर्ण करा. दरम्यान, केवायसीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता लाभार्थी ३० एप्रिलपर्यंत केवायसी करु शकतात. यानंतर तुम्हाला केवायसी करण्याची संधी मिळणार नाही. तुम्हाला ३० एप्रिलआधी बायोमेट्रिक अपडेट करायचे आहे.जर तुम्ही हे काम केले नाही तर तुम्हाला तुमचे रेशन कार्ड बंद केले जाईल.

जे लोक चुकीच्या मार्गाने रेशन कार्डवरुन धान्य घेतात, त्यांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हजारो लोक मृत व्यक्तीच्या नावावर रेशन घेतात. एकाच आधार कार्डशी अनेक रेशन कार्ड लिंक आहेत. त्यामुळेत बोगस लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

Ration Card
Ration Card: कामाची बातमी! ७० लाख रेशनकार्ड रद्द होण्याची शक्यता; १ एप्रिलपासून नियम बदलणार

केवायसी कशी करायची? (Ration Card ekYC Process)

रेशन कार्ड केवायसी करण्याची प्रोसेस खूप सोपी आहे. ज्या सदस्यांचे रेशन कार्डवर नाव आहे त्यांना आधार कार्ड घेऊन रेशन दुकानावर जायचे आहे. यानंतर तुम्हाला फिंगरप्रिंट बायोमेट्रिक करायचे आहे. ज्या सदस्यांचे रेशन कार्डवर नाव आहे त्यांना सर्वांना बायोमेट्रिक करायचे आहे. यासाठी ३० एप्रिलपर्यत मुदत आहे.

Ration Card
Ration Card Update: गॅस टंचाईत दिलासा! रॉकेल वाटप सुरू होणार? रेशनकार्ड लवकर अपडेट करा नाहीतर...; घरबसल्या करा प्रोसेस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com