आधार कार्ड हे अत्यावश्यक ओळखपत्र आहे.
आधार कार्ड संबंधित अनेक फसवणुकीच्या घटना घडत आहेत.
आधार ॲपमधील क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही खरे आणि खोटे आधार कार्ड तपासू शकता.
आजच्या काळात आधार कार्ड हे स्वतःचे ओळख दाखवणारे महत्त्वाचे आणि अत्यावश्यक ओळखपत्र आहे. सर्व ठिकाणी तुम्हाला पहिले तुमचे आधार कार्ड विचारले जाते. बँकेचे काम ते हॉटेल चेक-इनपर्यंत सर्व ठिकाणी आधी आधार कार्ड मागतात. मात्र सध्या आधार कार्ड बाबत अनेक फसवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत. बनावटगिरीची प्रकरणेही वाढली आहेत.
अनेक लोकांना खरे आधार कार्ड बोलून बनावट आधार कार्डच्या प्रती देतात. त्यामुळे आधार कार्ड घेताना विशेष सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. तुम्ही आता काही सेकंदात तुमच्याकडे असलेले आधार कार्ड खरे आहे की बनावट, हे तपासू शकता. कसं ते जाणून घेऊयात.
UIDAI एक विशेष सुरक्षा वैशिष्ट्य घेऊन आले आहे. ज्यामुळे मोबाईल फोनवरून आधार कार्ड स्कॅन करून त्वरित खरे - खोटे ओळखू शकता. ही पद्धत केवळ सोपीच नाही, तर काही सेकंदात तुम्हाला अचूक माहिती देते. आधार क्यूआर कोड स्कॅनर हे आधार ॲपमध्ये दिलेले एक डिजिटल फीचर आहे. याच्या मदतीने, तुम्ही तुमच्या आधार कार्डचा QR कोड स्कॅन करून त्यातील माहितीची त्वरित पडताळणी करू शकता. नाव, जन्मतारीख आणि फोटो यांसारखी महत्त्वाची माहिती तुम्हाला सुरक्षितपणे दाखवली जाते.
पायरी १ - सर्वप्रथम, तुमच्या मोबाईलवर UIDAI चे अधिकृत आधार ॲप डाउनलोड करा. ॲप उघडल्यानंतर, तुम्हाला 'QR कोड स्कॅनर' किंवा 'स्कॅन QR' हा पर्याय दिसेल.
पायरी २ - त्यानंतर तुमच्या कॅमेऱ्याने QR कोड स्कॅन करा. तुम्ही स्कॅन पर्यायावर क्लिक करताच, तुमच्या फोनचा कॅमेरा उघडेल. आता आधार कार्डचा QR कोड कॅमेऱ्यासमोर ठेवा आणि तो स्कॅन करा.
पायरी ३ - एकदा QR कोड स्कॅन झाल्यावर, ॲप त्यातील एनक्रिप्टेड डेटा डीकोड करते. तुमचे नाव, फोटो आणि जन्मतारीख यांसारखी माहिती स्क्रीनवर दिसते.
पायरी ४ - जर QR कोड बरोबर असेल आणि डेटा स्पष्टपणे दिसत असेल, तर आधार कार्ड खरे आहे. जर ते स्कॅन होत नसेल किंवा चुकीची माहिती दाखवत असेल, तर ते बनावट असू शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.