Ladki Bahin Yojana eKYC : महत्त्वाची बातमी! लाडक्या बहि‍णींकडे फक्त शेवटचे काही तास; eKYC त दुरुस्ती करा अन्यथा ₹१५०० बंद

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Today: लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्याची आज शेवटची संधी आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसीत दुरुस्ती करायची आहे.
Ladki Bahin Yojana eKYC
Ladki Bahin Yojana eKYCSaam tv
Published On
Summary

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

लाडकी बहीण योजनेत केवायसीत दुरुस्ती करण्याची शेवटची संधी

आजच हे काम करा अन्यथा लाभ कायमचा बंद

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची आज शेवटची संधी आहे. लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर आज ही मुदत संपणार आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहि‍णींच्या केवायसीत चुका झाल्या असतील त्यांनी आजच त्या दुरुस्त करायच्या आहेत. अन्यथा तुमचा लाभ कायमचा बंद होणार आहे.

लाडक्या बहि‍णींनी हे काम कराच (Ladki Bahin Yojana eKYC Last Date)

लाडकी बहीण योजनेत केवायसी करणे अनिवार्य केले आहे. केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२६ होती.केवायसीमध्येही अनेक महिलांनी चुका केल्या आहेत. त्यानंतर आता या महिलांना चूक सुधारण्याची शेवटची संधी आहे. आज तुम्हाला केवायसीत दुरुस्ती करायची आहे अन्यथा तुमचा लाभ कायमचा बंद होणार आहे.

लाडकी बहीण योजनेत केवायसी करताना प्रश्न नीट समजला नसल्याने केवायसी चुकीची झाली. त्यामुळे महिलांचा लाभ बंद करण्यात आला. त्यानंतर महिलांनी पुन्हा केवायसी सुरु करण्याची मागणी केली होती. यानंतर ही सुविधा पुन्हा सुरु केली. आता केवायसी करण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. त्यामुळे महिलांना लगेचच केवायसी करावी.

Ladki Bahin Yojana eKYC
Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता जमा, ८६ लाख महिलांना मिळाले नाही ₹१५००; कारण काय?

महिलांना मिळणार ४५०० रुपये (Ladki Bahin Yojana 4500 Rupees Installment)

लाडकी बहीण योजनेत केवायसीत चुक झाल्यामुळे महिलांचा लाभ तात्पुरता बंद करण्यात आला आहे. त्यानंतर आता केवायसीत दुरुस्ती केल्यानंतर महिलांचा लाभ पुन्हा सुरु केला जाणार आहे. महिलांना तीन महिन्याचे पैसे एकत्र मिळू शकतात. त्यांना रखडलेले सर्व हप्ते एकत्र दिले जातील. त्यामुळे महिलांच्या खात्यात ४५०० रुपये जमा होतील.

Ladki Bahin Yojana eKYC
Ladki Bahin Yojana: अपात्र लाडक्या बहिणींचा आकडा समोर; ७१ लाख महिलांचा ₹१५००चा लाभ कायमचा बंद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com