

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी
योजनेतून ७१ लाख महिलांना वगळले
ईकेवायसीची आज शेवटची संधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु होऊन जवळपास दोन वर्ष पूर्ण व्हायला आले आहेत. लाडकी बहीण योजनेचा सुरुवातीला जवळपास अडीच कोटी लाभार्थ्यांना लाभ घेतला आहे. त्यानंतर हळूहळू योजनेच्या निकषांमुळे अनेक महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. आतापर्यंत लाखो महिलांचे अर्ज बाद केले आहेत.
लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिलांना वगळले (Ladki Bahin Yojana Update)
लाडकी बहीण योजनेचे सुरुवातीला लाभार्थी जवळपास २ कोटी ४७ लाख होते. त्यानंतर आता या योजनेचे एकूण लाभार्थी १ कोटी ७८ लाख ५ हजार झाले आहेत. जवळपास ७१ लाख लाडक्या बहिणींना योजनेतून अपात्र ठरल्या आहेत. त्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे. त्यानंतर आता ईकेवायसीमध्ये दुरुस्ती न केलेल्या महिलादेखील यामध्ये जोडल्या जातील.
ईकेवायसीची शेवटची संधी (Ladki Bahin Yojana eKYC Deadline Today)
लाडकी बहीण योजनेत ईकेवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची शेवटची संधी तुमच्याकडे आहे. तुम्हाला आज दिवसभरात केवायसीत दुरुस्ती करायची आहे. जर तुम्ही केवायसीमध्ये काही चुक झाली असेल आणि दुरुस्ती केली नाही तर तुमचा लाभ बंद होणार आहे. त्यामुळे महिलांनी आज दिवसभरात केवायसी करायची आहे.
या कारणांमुळे ७१ लाख महिलांचा अर्ज बाद (Ladki Bahin Yojana 71 Lakh Women Application Removed)
लाडकी बहीण योजनेत निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे. पुरुष लाभार्थी, सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांना योजनेतून बाद केले आहे. याचसोबत केवायसी न केलेल्या महिला आधीच बाद झाल्या आहे. उत्पन्न गटात न बसलेल्या महिलांचे लाभ बंद करण्यात आले आहेत. बोगस लाभार्थ्यांवरही सरकारने कारवाई केली आहे. त्यांचे लाभ बंद करण्यात आले आहेत.
लाडकी बहीण योजनेत केवायसीची शेवटची तारीख ३१ डिसेंबर होती. ई केवायसीमध्ये फक्त १ कोटी ७० लाखांच्या महिलांनी केवायसी केले आहे. त्यातूनदेखील अनेक महिलांनी चुकीचा पर्याय निवडल्याने त्यांचा हप्ता बंद झाला आहे. जानेवारी महिन्यात ही संख्या १ कोटी ६९ लाख होती. आता केवायसी करण्याची शेवटची संधी आज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.