Shreya Maskar
तुमच्याकडे एखाद्या वेळी चार्जर नसला तर USB, power bank, car charger, wireless किंवा solar charger वापरून फोन चार्ज करता येतो. यांचा वापर कसा करावा, जाणून घेऊयात.
USB केबलचा वापर करून मोबाईल चार्ज करू शकता. USB केबल फोनला, लॅपटॉप , कॉम्प्युटरला जोडा.USB पोर्टमधून फोन चार्ज होतो. ही पद्धत वापरल्याने फोन हळू चार्ज होतो, मात्र ती सुरक्षित आहे.
पावर बँक हा चार्जरचा उत्तम पर्याय आहे. कायम बॅग फुल चार्ज केलेली पावर बँक ठेवा. यामुळे USB केबलने फोन झटपट चार्ज होतो.
गाडीमध्ये USB पोर्ट किंवा कार चार्जर वापरू शकता. यामुळे गाडी सुरू असताना फोन चार्ज करता येतो.
जर फोन सपोर्ट करत असेल तर तुम्ही वायरलेस चार्जिंगचा देखील वापर करू शकता. वायरलेस चार्जिंग पॅडवर फोन ठेवला की चार्ज होतो.
काही स्मार्टफोनमध्ये रिव्हर्स चार्जिंग फिचर असतो. ज्यामुळे एका फोनमधून दुसऱ्या फोनला चार्ज करता येते.
सूर्यप्रकाश वापरून फोन चार्ज करणारे चार्जर असते. मात्र यात चार्जिंग वेग कमी असतो.
वरील सर्व उपकरणे वापरताना विशेष काळजी घ्या, कारण सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. खराब किंवा नकली केबल वापरू नका. थेट वायर जोडून (DIY) चार्ज करण्याचा प्रयत्न करू नका हे जास्त धोकादायक आहे.