Summer Hair Care : सततच्या केस गळतीने हैराण झालात? १० दिवसांत येईल जाडजुड वेणी, फक्त करा 'हा' आयुर्वेदिक उपाय

Shreya Maskar

केस गळती

सतत केस गळती होत असेल तर घरीच उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून आयुर्वेदिक हेअर स्प्रे बनवा. १५ दिवसांत केस गळती थांबेल आणि केसांची चांगली वाढ होईल.

Hair Loss | yandex

हेअर स्प्रे

हेअर स्प्रे बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये मेथीचे दाणे, १ चमचा चहापत्ती, कलौंजी, १०-१२ लवंगा आणि मूठभर कांद्याची साले एकत्र करा.

Hair Spray | yandex

गरम पाणी

एका मोठ्या भांड्यात दोन ग्लास पाणी गरम करा आणि त्यात हे सर्व साहित्य घाला. पाणी अर्धे होईपर्यंत उकळवा. तुमचा हेअर स्प्रे तयार आहे. तो एका स्प्रे बॉटलमध्ये साठवून ठेवा.

Hot Water | yandex

केसांचा मसाज

हा हेअर स्प्रे दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या केसांच्या मुळांना व्यवस्थित लावा. टाळूवर हलक्या हाताने मसाज करा. तुम्हाला असे १५ दिवस करायचे आहे. या दरम्यान तुम्ही तुमचे केस नेहमीप्रमाणे धुवू शकता.

Hair Massage | yandex

तेलकट केस

स्प्रेसोबत केसांचे आठवड्यातून दोन वेळा तेल लावा. पण तेलकट केसांवर स्प्रे लावणे टाळा.

Oily Hair | yandex

चहाची पाने

चहाची पाने केसांना चमक आणि घनदाट बनवतात, मेथीचे दाणे केसगळती नियंत्रित करण्यास मदत करतात आणि कलौंजी टाळूच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट आहे. लवंगा टाळूतील रक्तसंचार सुधारतात आणि कांद्याची साले तुमच्या केसांना पोषण देतात.

Tea Leaves | yandex

केसगळती

या आयुर्वेदिक हेअर स्प्रेमुळे केसगळती थांबते. तुमचे केस अधिक दाट होतील. त्यांना एक अनोखी चमक येईल.

Hair Loss | yandex

टीप

घरगुती कोणतेही प्रोडक्ट चेहऱ्यावर लावताना सर्वात आधी त्याची पॅच टेस्ट करा. कारण आपली त्वचा खूप संवेदनशील असते.

Hair Spray | yandex

NEXT : 'हे' ३ पदार्थ वापरून बनवा बीटरूट फेस पॅक, चेहऱ्यावर दिसेल गुलाबी चमक

Skin Care | yandex
येथे क्लिक करा...